छोट्या करदात्यांना बजेटमध्ये दिलासा, हा कर पूर्णपणे हटवणार?

छोट्या करदात्यांना बजेटमध्ये दिलासा, हा कर पूर्णपणे हटवणार?

सरकार बजेटमध्ये डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स म्हणजे DDT पूर्णपणे हटवण्याची घोषणा करू शकतं. बजेटमध्ये छोट्या शेअरधारकांना दिलासा मिळू शकतो.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात (modi sarkar Budget 2020)सरकार मार्केटशी संबंधित करांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. 'CNBC आवाज'ला मिळालेल्या माहितीनुसार, सरकार बजेटमध्ये डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स म्हणजे DDT पूर्णपणे हटवण्याची घोषणा करू शकतं. याचबरोबर डिव्हिडंड वर 20 टक्क्यांचं स्टँडर्ड डिडक्शन देण्याची घोषणा करू शकतं. असं असलं तरी लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स पूर्णपणे हटवण्याची चिन्हं कमी आहेत. बजेटमध्ये छोट्या शेअरधारकांना दिलासा मिळू शकतो. पण यामुळे मोठ्या शेअरधारकांना धक्का बसू शकतो.

डिव्हिडंड वर इनकम टॅक्स होऊ शकतो लागू

सध्या डिव्हिडंड देणाऱ्या कंपनीला DDT भरावा लागतो. पण डिव्हिडंड भरणाऱ्यांवर कर भरण्याची जबाबदारी येऊ शकते. डिव्हिडंड हा एकूण उत्पन्नाचाच भाग मानला जाऊ शकतो. डिव्हिडंडवर इनकम टॅक्स (Income Tax) चे दर लागू होऊ शकतात. डिव्हिडंडवर 20 टक्क्यांचं स्टँडर्ड डिडक्शन मिळू शकतं.

(हेही वाचा : हे पेमेंट वॉलेट होणार बंद, लवकरच काढून घ्या पैसे, नाहीतर बसेल गंडा)

छोट्या करदात्यांना दिलासा

खालच्या स्लॅब मध्ये येणाऱ्या लोकांना कमी कर चुकवावा लागू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 टक्के स्लॅब वाल्या करदात्यांना जास्त कर चुकवावा लागू शकतो. सध्या 20. 55 टक्के DDT भरावा लागतो. यामध्ये सरचार्ज आणि एज्युकेशन सेसचा समावेश आहे. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त डिव्हिडंड घेणाऱ्यांना वेगळा कर लावला जाणार नाही, असा प्रस्ताव आहे. सध्या यावर 10 टक्के कर लागतो.

LTCG कर हटवण्याची शक्यता कमी

लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG)हटवण्याची शक्यता कमी आहे पण LTCG या टॅक्समध्ये दिलासा मिळण्याची शक्यता जास्त आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डायरेक्ट टॅक्सबदद्लच्या टास्क फोर्सनेही LTCG टॅक्ट हटवण्याची शिफारस केली नव्हती.

(हेही वाचा : Zomato ने Uber Eats ने घेतलं विकत, कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार)

=============================================================================

First published: January 21, 2020, 5:46 PM IST

ताज्या बातम्या