मराठी बातम्या /बातम्या /मनी /दररोज केवळ 50 रुपयांची बचत करुन व्हाल करोडपती, ही सोपी पद्धत पाहाच

दररोज केवळ 50 रुपयांची बचत करुन व्हाल करोडपती, ही सोपी पद्धत पाहाच

करोडपती बनण्याचं हे स्वप्न म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करुन पूर्ण करता येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही दररोज केवळ 50 रुपयांची बचत केली, तर रिटायरमेंटपर्यंत सहजपणे कोट्यवधी बनता येईल.

करोडपती बनण्याचं हे स्वप्न म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करुन पूर्ण करता येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही दररोज केवळ 50 रुपयांची बचत केली, तर रिटायरमेंटपर्यंत सहजपणे कोट्यवधी बनता येईल.

करोडपती बनण्याचं हे स्वप्न म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करुन पूर्ण करता येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही दररोज केवळ 50 रुपयांची बचत केली, तर रिटायरमेंटपर्यंत सहजपणे कोट्यवधी बनता येईल.

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : प्रत्येकालाच आपण कोट्यवधी व्हावं असं वाटत असतं. बँक अकाउंटमध्ये करोडो रुपये असावेत असं अनेकांचं स्वप्न असू शकतं. नोकरदार वर्गासाठी इतकी मोठी रक्कम जमा करणं सोपं नाही. मर्यादित उत्पन्न आणि खर्चांमुळे अधिक बचत होऊ शकत नाही. असं असलं, तरीही एका गोष्टीने कोट्यवधी बनण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतं.

करोडपती बनण्याचं हे स्वप्न म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करुन पूर्ण करता येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही दररोज केवळ 50 रुपयांची बचत केली, तर रिटायरमेंटपर्यंत सहजपणे कोट्यवधी बनता येईल. म्युच्युअल फंड SIP मध्ये तुम्ही छोट्या मासिक गुंतवणुकीतून मोठी रक्कम जमा करू शकता. ही स्किम मोठ्या कालावधीसाठी अतिशय फायदेशीर आहे.

कोट्यवधी होण्यासाठी गुंतवणुकीची सुरुवात तुमच्या करियरच्या अगदी सुरुवातीपासूनच करायला हवी. जर तुम्ही 25 वर्ष वयापासून गुंतवणूक करण्यास सुरू करत असाल, तर यातून मोठा फायदा होईल.

या बँकेत होईल मोठा फायदा, दर महिन्याला 28 रुपये जमा करुन मिळेल 4 लाखांचा बेनिफिट

25 व्या वर्षी करा गुंतवणूक -

जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षापासून दररोज 50 रुपयांची बचत करण्यास सुरुवात केली आणि हे बचतीचे पैसे म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवले, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तुम्ही सहजपणे करोडपती बनू शकता. म्हणजेच 35 वर्षात दररोज 50 रुपये सेविंग करावं लागेल.

50 रुपयांची बचत दररोज केली, तर महिन्याला 1500 रुपये होतील. म्युच्युअल फंड सरासरी 12 ते 15 टक्के रिटर्न देतं. तुम्ही 35 वर्षांच्या या मोठ्या कालावधीत एकूण 6.3 लाख रुपये गुंतवणूक केली. यात 12.5 टक्के रिटर्न मिळाल्यास, याची व्हॅल्यू 1.1 कोटी रुपये होईल.

30 व्या वर्षी गुंतवणूक -

जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करत असाल, तर हा मोठा कालावधी 5 वर्षांसाठी कमी होईल आणि तुम्हाला 30 वर्ष गुंतवणूक करावी लागेल. यात 1500 रुपये महिन्याच्या हिशोबाने 30 वर्षात एकूण 5.4 लाख रुपये होतील. याची एकूण व्हॅल्यू 59.2 लाख रुपये होईल. एकूण 5 वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी कमी झाल्याने जवळपास 40 लाख रुपयांचं नुकसान होईल.

First published:
top videos

    Tags: Money, Savings and investments