OMG VIDEO : डब्बावाला कुरियर! आठवीतल्या तिलक मेहताची भन्नाट बिझनेस आयडिया

मुंबईचा तिलक मेहता अवघ्या 13 वर्षांचा आहे, तो आठवीत शिकतो. रोज तो त्याच्या शाळेत येतो, वर्गात बसतो,अभ्यास करतो, मित्रांशी मस्ती करतो... आणि रविवारी त्याच्या बिझनेस ऑफिसला जातो. तिलक मेहताने मुंबईतल्या डबेवाल्यांसोबत 'पेपर्स अँड पार्सल्स' ही एक अनोखी कुरियर कंपनी सुरू केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 08:13 PM IST

OMG VIDEO : डब्बावाला कुरियर! आठवीतल्या तिलक मेहताची भन्नाट बिझनेस आयडिया

मुंबई, 15 जुलै : मुंबईचा तिलक मेहता अवघ्या 13 वर्षांचा आहे, तो आठवीत शिकतो. रोज तो त्याच्या गरोडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर लर्निंग या शाळेत येतो, वर्गात बसतो,अभ्यास करतो, मित्रांशी मस्ती करतो... आणि रविवारी ऑफिसला जातो.

ऑफिस ? आणि तेही 13 वर्षांच्या तिलक मेहताचं ? हो. पण तो तिथे नोकरी करत नाही. या ऑफिसचा तो मालक आहे आणि एक यशस्वी बिझनेसमन. पेपर्स अँड पार्सल्स अशी त्याची एक अॅप बेस्ड कुरिअर कंपनी आहे.

तुम्हाला एखादी गोष्ट एका दिवसात आणि कमी किंमतीत कुठे पोहोचवायची असेल तर त्यासाठी त्याने 'पेपर्स अँड पार्सल्स' ही कुरियर कंपनी काढली आहे. या कंपनीची आयडिया तिलकला सुचली कशी आणि मुळात एवढ्या लहान वयात बिझनेस करावा,असं का वाटलं ?

तिलक सांगतो, एक दिवस मी माझ्या काकांकडे गेलो आणि माझं एक पुस्तक तिथेच विसरून आलो. मी बाबांना म्हटलं, आपण एखाद्या कुरियर कंपनीला माझं पुस्तक आणायला सांगू. तर बाबा म्हणाले, अशी कोणतीही कुरियर कंपनी नाही. आणि ते पुस्तक कुरियरने मागवायचं असेल तर त्यासाठी पुस्तकापेक्षाही जास्त खर्च येईल.

Loading...

तिलक यावर विचार करत होता तेव्हाच त्याने त्याच्या कॉलेजमध्ये एका डबेवाल्याला पाहिलं. मुंबईचे हे डबेवाले घरून ऑफिसमध्ये डबे पोहोचवतात. ते कसं काम करतात ते त्याने जाणून घेतलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे डबेवाले अत्यंत स्वस्तात हे काम करत होते.

हे ऐकल्यावर तिलकने डबेवाल्यांशी टाय अप करायचं ठरवलं. त्यांनी डब्यांसोबतच कुरियरही घेऊन जायचं, अशी ही कल्पना. त्याने त्याचे काका घन:श्याम पारेख यांना ही कल्पना सांगितली तेव्हा तेही खूश झाले. त्यांनी चक्क आपली बँकेची नोकरी सोडली आणि तिलकची कंपनी जॉइन करायचं ठरवलं.

Amazon ची मोठी ऑफर, Prime सबस्क्रिप्शनसाठी 500 रुपयांचा डिस्काउंट!

आपली आयडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी तिलकने डबेवाल्यांसोबत ट्रेनमधून प्रवास केला आणि कमीत कमी किंमतीत कुरियर कसं पोहोचवता येईल याची पडताळणी केली, प्लॅनिंग केलं आणि कंपनीचं काम सुरू झालं.

जुलै 2018 मध्ये तिलकची ही कंपनी सुरू झाली आणि त्याच्यासोबत 300 डबेवाले काम करतात. हे डबेवाले एका दिवसांत तुमच्या वस्तू, कागदपत्रं अगदी कमी किंमतीत पोहोचवतात.

पेपर्स अँड पार्सल्स या कंपनीचे सध्या एक हजार ग्राहक आहेत. यामध्ये काही मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. या कंपनीचं टार्गेट हळूहळू वाढवण्याचा तिलकचा विचार आहे पण सध्यातरी त्याचे ग्राहकांचं समाधान हीच त्याची मोठी संपत्ती आहे.

==========================================================================================

सेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 08:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...