Home /News /money /

वजीरएक्सतर्फे देशातला पहिला Crypto Transparency report सादर

वजीरएक्सतर्फे देशातला पहिला Crypto Transparency report सादर

क्रिप्टो करन्सीबद्दल उत्सुकता आहे, पण या नव्या करन्सीबद्दल अनेक भारतीयांच्या मनात भीती आणि गैरसमज आहेत. WazirX Cryptocurrency report मुळे ते दूर व्हायला मदत होईल. काय आहे हा रिपोर्ट?

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: आपल्या देशात क्रिप्टोकरन्सीची (Crypto Currency in India) उलाढाल वेगानं वाढत असतानाच दुसरीकडे या क्षेत्राकडे धोरणकर्ते आणि अन्य घटकांकडून दुर्लक्षही केलं जात आहे. त्यामुळे या क्षेत्रातले गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या हितसंरक्षणासाठी वजीरएक्ससारख्या प्रमुख घटकांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वजीरएक्सतर्फे (WazirX Cryptocurrency report) पहिला क्रिप्टो पारदर्शकता अहवाल सादर करण्यात आला आहे. भारतात (India) या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांना पाठबळ देण्याची गरज का आहे, हे यातून स्पष्ट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्रिप्टो करन्सीबद्दलचे गैरसमज आणि भीती वजीरएक्स हे भारतातील पहिले क्रिप्टो एक्सचेंज (Crypto Exchnage) असून, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि संस्थात्मक भागीदारांसमोर हा क्रिप्टो ट्रान्स्परन्सी अहवाल (Crypto Transperancy Report) सादर करून त्यांच्या मनात क्रिप्टो करन्सीबाबत असलेले गैरसमज, भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. वजीरएक्सने या क्षेत्राबाबत केवळ उच्च मापदंड स्थापन केलेले नाहीत, तर देशातल्या नवकल्पनांनाही (Innovations) प्रोत्साहन दिलं आहे. या अहवालाद्वारे या उद्योग क्षेत्राच्या नियामकांना (Regulators) धोरण विकसित करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे या उद्योगालाही सरकार (Government) आणि कायदे विभागाकडून (Law Agencies) येणाऱ्या माहितीच्या विनंतीबाबत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वजीरएक्सने विविध यंत्रणांकडून आलेल्या विनंत्यांच्या आधारे कायदेशीर प्रक्रियेचा काळजीपूर्वक अभ्यास करून एक पद्धत ठरवली आहे. वजीरएक्सने कायदा विभागाकडून आलेल्या मदतीच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. वजीरएक्सकडे एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत कायदा विभागाने 377 वेळा मदतीची मागणी केली होती. ती पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी 38 प्रकरणं विदेशी कायदा अंमलबजावणी यंत्रणांकडच्या केसेसशी निगडित होती. ही सगळी प्रकरणं गुन्हेगारी स्वरूपाची होती. त्या सगळ्या प्रकरणी मदत केली असल्याचं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. Accounts का लॉक झाली? एप्रिल 2021 आणि सप्टेंबर 2021 दरम्यान कंपनीने 14,469 खाती लॉक (Account Lock) केली आहेत. यातली 90 टक्के खाती ग्राहकांनी बंद करण्यास सांगितली होती, तर फक्त 10 टक्के खाती पेमेंटवरच्या वादामुळे किंवा एलईए प्रकरणांसाठी चालू असलेल्या चौकशीमुळे कंपनीच्या कायदेशीर विभागाने सांगितल्यावरून लॉक केली असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एक्स्चेंजद्वारे केल्या जाणाऱ्या कारवायांचा ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो, त्याबाबत युझर्सना माहिती देण्याचाही हा एक उपक्रम आहे. क्रिप्टोकरन्सीकडे लोकांचा ओढा वाढत असताना मनी लाँड्रिंग (Money Laundering) आणि करचोरी (Tax evasion) प्रकरणात क्रिप्टोकरन्सीचा वापर होत असल्यानं क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यात जोखीम असल्याचं सांगत अनेक प्रशासकीय अधिकारी याला विरोध करतात. आपल्या सर्व ग्राहकांची केवायसी प्रक्रियेद्वारे खातरजमा करून कायद्यांचं पालन केलं जातं, असंही वजीरएक्सने नमूद केलं आहे. अहवाल का महत्त्वाचा? 'हा अहवाल आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असून, असे महत्त्वपूर्ण उपक्रम भारतातले क्रिप्टोबाबतचे गैरसमज दूर करण्यास, नियमांत बदल करण्यास कारणीभूत ठरतील. अशा उपक्रमांमुळे या उद्योगक्षेत्रातल्या परिसंस्थेची विश्वासार्हता वाढेल आणि अधिकाधिक व्यक्ती याकडे आकर्षित होतील. यातूनच या उद्योगासाठी योग्य नियम येतील अशी अपेक्षा आहे,' असं मत वजीरएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक निश्चल शेट्टी यांनी व्यक्त केलं. या वेळी कंपनीने ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची (Blockchain Technology) माहिती देणारा 'ब्लॉकचेन पेपर्स' (बीपी) हा देशातला पहिला ब्लॉकचेनविषयक संशोधन आणि विश्लेषण प्लॅटफॉर्म दाखल केला. ब्लॉकचेन इकोसिस्टीममधल्या घडामोडी, जगभरातले व्यवसाय, उद्योग आणि अर्थव्यवस्थांवर होणारा परिणाम याचं सखोल विश्लेषण याद्वारे केलं जातं, असं वजीरएक्सने म्हटलं आहे. या प्लॅटफॉर्मच्या मुख्य संशोधन गटात वरिष्ठ संशोधन सहायक, अनुभवी पत्रकार आदींचा समावेश आहे. 'पारदर्शकता अहवाल आणि ब्लॉकचेन पेपर्स प्लॅटफॉर्म (BP Papers Platform) हा देशातले धोरणकर्ते आणि युझर्स यांच्यासाठी क्रिप्टोमध्ये पारदर्शकता निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे. पारदर्शकता अहवालात कंपनीतल्या घडामोडींवर भर देण्यात आला आहे, तर वेब 3.0 (Web 3.0) तयार करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्लॉकचेन विश्वातल्या सर्व प्रमुख हालचाली, विश्लेषण आणि नोंदी करण्यासाठी बीपी प्लॅटफॉर्म महत्त्वाचा आहे,' असं कंपनीच्या पब्लिक पॉलिसी विभागाच्या संचालकांनी सांगितलं. web 3.0 महत्त्वाचं अत्याधुनिक वेबसाइट आणि अॅप्सच्या निर्मितीसाठी वेब 3.0 महत्त्वाचं आहे. बीपी दस्तऐवजीकरणाचं विश्लेषण करील. लवकरच वेब 3.0 ची व्यावसायिक तत्त्वं तयार केली जातील. लोकशाही आणि विकेंद्रीकरणाच्या तत्त्वांवर आधारित धोरणं तयार करण्यासाठी सर्व ती मदत करणं हे आमचं ध्येय आहे, असंही वजीरएक्सने आपल्या निवेदनात नमूद केलं आहे.
First published:

Tags: Cryptocurrency

पुढील बातम्या