रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा

रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर क्राइमचा धोकाही वाढत चाललाय. त्यामुळे सायबर सिक्युरिटी आवश्यक बनली आहे. तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सायबर क्राइमचा धोकाही वाढत चाललाय. त्यामुळे सायबर सिक्युरिटी आवश्यक बनली आहे. तुम्हाला तुमचे पैसे सुरक्षित ठेवायचे असतील तर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता. HDFC एर्गोने सायबर इन्शुरन्स पॉलिसी लाँच केलीय. यामध्ये तुम्ही रोज 3 हजार रुपये खर्च करून 50 हजार रुपयांचा विमा घेऊ शकता.

सायबर अ‍ॅटॅकपासून संरक्षण

ही पॉलिसी अनेक प्रकारची सायबर सुरक्षा देते. यामध्ये बनावट ऑनलाइन ट्रान्जॅक्शन, फिशिंग आणि ईमेल स्पूफिंग, ई एक्स्टॉर्शन, आयडेंडिटी थेफ्ट आणि सायबर बुलिंग हे सगळे प्रकार येतात. HDFC एर्गो ची सायबर इन्शुरन्स पॉलिसी सामान्य लोक आणि त्यांच्या कुटुंबीयांना सायबर अ‍ॅटॅकपासून संरक्षण देते.

ऑनलाइन व्यवहारांच्या बाबत भारत ही जगातली दुसरी प्रमुख बाजारपेठ आहे. इथे सायबर इन्शुरन्सचा व्यवसाय वाढवण्याच्या अनेक शक्यता आहेत. यामध्ये ऑनलाइन फसवणूक आणि गैरव्यवहारांची सगळी प्रकरणं कव्हर होतात. पूर्ण कुटुंबासाठीच ही सायबर सुरक्षा घेता येते.

(हेही वाचा : आजच फुल करा गाडीची टाकी, पेट्रोल आणि डिझेल महागण्याची शक्यता)

सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या

या पॉलिसीमध्ये तुम्ही, तुमचे पती-पत्नी आणि दोन मुलं एवढ्या जणांना संरक्षण मिळतं. यात सगळी डिव्हाइस आणि लोकशनचा सहभाग आहे. त्याचबरोबर सायबर फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टाचा खर्चही मिळतो.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या एका रिपोर्टनुसार, 2016 मध्ये सायबर क्राइमच्या घटनांमध्ये 6.3 टक्के वाढ झाली आहे. 2015 मध्ये देशात सायबर गुन्ह्यांची 11 हजार 592 प्रकरणं दाखल झाली. त्याचवेळी 2016 मध्ये ही संख्या 12 हजार 317 वर पोहोचली. सायबर क्राइमची ही वाढती संख्या पाहता अशा प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी आवश्यक बनली आहे.

=====================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 10, 2019 08:50 AM IST

ताज्या बातम्या