Home /News /money /

Cyber Fraud : वीज बिल थकलं असेल तर सावध व्हा; सायबर ठगांकडून होऊ शकते फसवणूक, चुकूनही 'हे' करू नका

Cyber Fraud : वीज बिल थकलं असेल तर सावध व्हा; सायबर ठगांकडून होऊ शकते फसवणूक, चुकूनही 'हे' करू नका

वीज बिल (Electricity bill) थकले आहे अशा लोकांना सायबर ठग टार्गेट करत आहेत. वीज कनेक्शन (Electricity Connection) तोडण्याची भीती दाखवून त्यांच्या बँक खात्यासह वैयक्तिक माहिती मिळवून वीज ग्राहकांची फसवणूक करत आहेत.

    मुंबई, 17 मे : सायबर गुन्हेगार (Cyber Criminal) लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन मार्ग अवलंबत आहेत. आता सायबर ठगांनी वीज ग्राहकांना लक्ष्य केलं आहे. वीज विभागाचे कर्मचारी बनून ते आता लोकांची बँक खाती (Bank Account) रिकामी करत आहेत. हरियाणामध्ये अशा फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी एक अॅडव्हायजरी प्रसिद्ध करून लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ज्यांचे वीज बिल थकले आहे अशा लोकांना सायबर ठग टार्गेट करत आहेत. वीज कनेक्शन (Electricity Connection) तोडण्याची भीती दाखवून त्यांच्या बँक खात्यासह वैयक्तिक माहिती मिळवून वीज ग्राहकांची फसवणूक करत आहेत. चोरीसाठी SMS चा वापर हरियाणा पोलिसांनी एक अॅडव्हायझरी प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटलंय, सायबर फसवणूक करणारे लोकांच्या फोन नंबरवर एसएमएस पाठवून फसवणूक करत आहेत. या मेसेजमध्ये तुम्ही भरलेले वीज बिल अपडेट केलेले नाही, त्यामुळे तुमचं वीज कनेक्शन तोडलं जाईल, असं लिहिलं आहे. या एसएमएसमध्ये फोन नंबरही देण्यात येत असून, त्यावर संपर्क साधून बिल अपडेट करा, असं सांगण्यात येत आहे. Multibagger Stock : 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांना वर्षभरात तिप्पट परतावा, तज्ज्ञांच्या मते अजूनही गुंतवणुकीची संधी एखाद्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला की फसवणूक करणारे त्याला बोलण्यात गुंतवतात. तसंच थकित वीजबिल पडताळण्याच्या बहाण्याने ते ग्राहकांना बँक खात्याचे डिटेल शेअर करण्यास सांगतात. याशिवाय, ते AnyDesk, Team Viewer सारखे रिमोट अॅक्सेस अॅप्लिकेशन्स (Remote Access Application) इन्स्टॉल करायला लावण्याचा प्रयत्न करतात. आता गाडी चालवणं अधिक सुरक्षित होणार; टायर्ससाठीही येणार स्टार रेटिंग, सरकार लागू करणार नवा नियम बोलण्यात गुंतवून करतात खाती रिकामी पोलीस म्हणाले, जे लोक या गुंडांच्या बोलण्यात येऊन त्यांचे बँक डिटेल्स किंवा इतर कोणतीही महत्त्वाची माहिती त्यांच्याशी शेअर करतात, त्यांना हे चोर आपलं लक्ष्य करतात आणि लुटतात. मिळालेल्या माहितीच्या आधारे हे चोर ऑनलाईन पद्धतीने त्या व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे काढतात. या गुन्हेगारांच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीने आपल्या फोनमध्ये अॅप डाउनलोड केलं की, हे चोर फोन हॅक करून त्या व्यक्तीच्या बँक खात्याचे डिटेल्स वापरून त्याच्या खात्यातून पैसे लुटतात माहिती शेअर न करण्याचं पोलिसांचं आवाहन सायबर चोरांपासून सावध राहण्याचं आवाहन करत हरियाणा पोलिसांनी सांगितलं की, वीज बिलाशी संबंधित कोणतीही माहिती कोणत्याही एसएमएस किंवा कॉलरला देऊ नका. तुमच्या फोनवर कोणतंही अॅप डाउनलोड करू नका किंवा कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका. तसंच कोणीही अशा फसवणुकीला बळी पडल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती द्यावी, जेणेकरून आरोपींचा शोध घेता येईल, असं पोलिसांनी म्हटलंय.
    First published:

    Tags: Cyber crime, Electricity, Electricity bill, Money, Online fraud

    पुढील बातम्या