एक फोन करेल घात! 'या' नंबरपासून सावधान, रिकामं होतंय बँक खातं

एक फोन करेल घात! 'या' नंबरपासून सावधान, रिकामं होतंय बँक खातं

थोडीशी सतर्कता नसेल तर एका सेकंदात तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट: कॉल, मेल किंवा एखाद्या अॅपची लिंक सेंड करून फसवणूक केल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. एका फोनद्वारे ग्राहकांची लूट केली जात असल्याचा अलर्ट भारत सरकारकडून देण्यात आला आहे.

फेक कॉलबाबत भारत सरकारनं गृहमंत्रालयाच्या सायबर सिक्युरिटी हँडलवरून नागरिकांना इशारा दिला आहे. 92 नंबरवरून येणारे फोन नागरिकांनी उचलू नयेत त्यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होण्याची शक्यता आहे असं सांगण्यात आलं आहे. या नंबरवरून कॉल करून डेबिट कार्ड, बँक व्हेरिफिकेशन, क्यू आर कोड इत्यादीची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे वाचा-PHOTOS : एकाच नंबरवरून 4 फोनवर वापरता येणार Whatsapp?

आपला कोणताही OTP, क्यू आर कोड, पॅन नंबर किंवा इतर माहिती अशा नंबरवरून येणाऱ्या किंवा अनोळखी नंबरवरून येणाऱ्या फोनला देऊ नका. त्यामुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. सायबर हल्ला करणाऱ्यांनी नवीन रणनिती सुरु केली असून बऱ्याचदा याचे बळी आपणही होऊ शकतो.

थोडीशी सतर्कता नसेल तर एका सेकंदात तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. त्यामुळे अशा नंबरवरून येणाऱ्या फोनना न उचलणं केव्हाही चांगलं आणि दुसरं म्हणजे आपली कोणतीही माहिती दुसऱ्याला अशा प्रकारच्या अनोळखी फोन नंबरला देऊ नये असा इशारा राज्य सरकारनं दिला आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 13, 2020, 10:20 AM IST

ताज्या बातम्या