मनी

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

सायबर अलर्ट! दिवाळी खरेदीसाठी मिळणाऱ्या ऑफर्सना बळी पडू नका, पोलिसांचे आवाहन

सायबर अलर्ट! दिवाळी खरेदीसाठी मिळणाऱ्या ऑफर्सना बळी पडू नका, पोलिसांचे आवाहन

सणासुदीच्या या दिवसांत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

  • Share this:

मनोज राठोड, भोपाळ, 06 नोव्हेंबर: सणासुदीच्या या दिवसांत मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मध्य प्रदेशात देखील अशाच काही घटना समोर आल्याने पोलिसांनी जनतेला सावध केलं आहे. सणासुदीच्या या दिवसांत तुम्हाला विविध ऑफर्सची लालूच दाखवून लूट केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याठिकाणी अशा घटना घडल्या आहेत की, बँक मॅनेजर असल्याचं सांगून लोकांची फसवणूक केली जात होती. अशी फसवणूक करणाऱ्या एका गँगला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

मध्य प्रदेशातील सायबर क्राईम पोलिसांनी एका गुन्ह्यावरून तपास करताना या गँगला ताब्यात घेतलं आहे. भोपाळमधील  आर. बी. अग्रवाल यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बँक मॅनेजर असल्याचे सांगून अज्ञात आरोपीने त्यांची फसवणूक केली होती. केवायसी अपडेट करायचे असल्याचे सांगून त्यांच्या फोनवर आलेला ओटीपी क्रमांक त्यांच्याकडे मागितला आणि तो वापरून त्यांच्या बँक खात्यातील 43 हजार रुपये काढून फसवणूक केली.

(हे वाचा-मोठी बातमी! या सरकारी कंपन्या पुढील 9 महिन्यात बंद होण्याची शक्यता)

पोलिसांनी या गुन्ह्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 419, 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये आरोपी बिहारमधील असून त्याने घरात बसून ही फसवणूक केली होती असं लक्षात आलं. नरेश यादव असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अशा पद्धतीने करत होता फसवणूक

या आरोपीची एक पूर्ण गँग असल्याचे तपासात समोर आले. ते लोकांना फोन करून आपण बँकेतून मॅनेजर बोलत असल्याचं खोटं सांगत. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांना बँक खात्याचं केवायसी पूर्ण करण्यासाठी माहिती हवी आहे असं सांगायचे. जर तुम्ही खात्याची केवायसी केली नाही तर ते बंद होईल हे पटवून देत असत. त्यामुळे अनेकजण घाबरून आपली सर्व माहिती त्यांना देत असतं. त्यानंतर आरोपी त्यांचे डेबिट कार्ड नंबर, सीवीवी नंबर आणि ओटीपी घेऊन त्यांच्या खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असंत.

(हे वाचा-आता तरी कमी होणार का कांद्याचे भाव? NAFED ने उचललं महत्त्वाचं पाऊल)

सायबर पोलिसांनी दिला अलर्ट

या संदर्भात माहिती देताना सायबर क्राईमचे अॅडिशनल एसपी संदेश जैन यांनी सांगितले, सणासुदीच्या दिवसात या लोकांची नजर नागरिकांच्या बँक खात्यांवर असते. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक मोठ्या प्रमाणात होते. कोणत्याही अज्ञात व्यक्तीला आपल्या बँक खात्याची माहिती न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ऑनलाईन खरेदी करताना देखील सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दिवाळीच्या तोंडावर ऑनलाईन सेल मोठ्या प्रमाणात असल्याने ऑनलाईन खरेदी करताना नागरिक आपल्या डेबिट कार्डची माहिती टाकतात. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक करणारे याचा फायदा घेत नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 6, 2020, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading