पुणे, 16 मे : पुण्यातील मल्टिनॅशनल कंपनी कमिन्स कंपनीने स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली आहे. कमिन्स कंपनीने त्यांच्या कोथरूड इंजिन प्लांट येथील कर्मचाऱ्यांसाठी ही योजना जाहीर केली आहे. यामुळे अनेक कामागारांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू होणार
>> कंपनीत शॉपफ्लोर आणि ऑफिस श्रेणीमध्ये काम करणारे कायमस्वरुपी कर्मचारी.
>> कर्मचारी ज्यांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त आणि वय 57 वर्षांपेक्षा कमी आहे.
>> असे कर्मचारी जे 10 वर्षे आणि त्याहून अधिक काळासाठी कायमस्वरूपी कर्मचारी आहेत.
Cummins announces voluntary retirement scheme at its Kothrud Engine Plant, Pune
▶️Permanent employees who are working in the shopfloor & office category
▶️Employees who are above 45 years of age and less than 57 years of age
▶️Employees on permanent rolls for 10 years and more pic.twitter.com/sqypkzyYwX
कमिन्स इंक. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन आहे, जी इंजिन वितरण, डिझाईन आणि फिल्ट्रेशनचं काम करते. कमिन्स कंपनी इंजिन आणि त्यासंबंधीचे उपकरणे ज्यामध्ये फ्युएल सिस्टम, कंट्रोल्स, एअर हॅन्डलिंग, फिल्ट्रेशन, इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन सिस्टम यांची देखील सेवा देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.