• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Cryptocurrency वर बॅन नाही आणणार सरकार! टेरर फंडिंग रोखण्यासाठी क्रिप्टो रेग्युलेट करण्याची तयारी- सूत्र

Cryptocurrency वर बॅन नाही आणणार सरकार! टेरर फंडिंग रोखण्यासाठी क्रिप्टो रेग्युलेट करण्याची तयारी- सूत्र

Cryptocurrency

Cryptocurrency

केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. ही बातमी समोर आल्यापासून लोकं असा अंदाज लावत आहेत की सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: क्रिप्टोकरन्सीबाबत देशभरात (Investment in Cryptocurrency) सध्या विविध चर्चा सुरू आहेत. डिजिटल करन्सी भारतात बॅन होणार का? तसं झाल्यास यात आधीच ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्याचं काय होणार? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांना उद्धवले आहेत. केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. ही बातमी समोर आल्यापासून लोकं असा अंदाज लावत आहेत की सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. या बातम्यांमुळे बिटकॉइनची किंमत एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर गेली आहे. सरकारच्या या निर्णयाचा काय परिणाम होईल याचा अंदाज बाजार आणि तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. परंतु सूत्रांनी CNCB-TV18 ला दिलेल्या माहितीनुसार, सरकार ज्या प्रकारच्या नियमनाबद्दल बोलत आहे त्यामुळे क्रिप्टोकरन्सीवर पूर्ण बंदी येणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, "नियमन यंत्रणा निश्चित झाल्यानंतर, क्रिप्टोकरन्सीचा कोणताही गैरवापर होणार नाही. सरकारला काळजी आहे की क्रिप्टोचा वापर दहशतवाद निधीसाठी केला जाऊ नये." हे वाचा-सरकारने BAN आणल्यास तुम्ही खरेदी केलेल्या क्रिप्टोकरन्सीचं काय होईल? सूत्रांच्या माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर चलन म्हणून मान्यता दिली जाणार नाही कारण त्यामुळे मूळ चलन आणि देशाच्या कर प्रणालीला धोका निर्माण होईल. त्यां"क्रिप्टोकरन्सीसाठी एक कठोर यंत्रणा तयार केली जाईल जेणेकरुन कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीज हे शोधू शकतील की क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार कोठून झाले आणि ते कोणत्याही देशविरोधी किंवा बेकायदेशीर हेतूंसाठी वापरले जात आहे का." हे वाचा-क्रिप्टोकरन्सीवर बंदी येणार? हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय घेणार मोदी सरकार क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल, 2021 हे  (The Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021) हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करण्यात येणाऱ्या 26 विधेयकांपैकी एक आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी भाजप नेते जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची बैठक झाली. या बैठकीत क्रिप्टोकरन्सी फायनान्स आणि त्याच्या भागधारकांशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यात आली. यानंतर क्रिप्टोकरन्सींवर पूर्णपणे बंदी घातली जाणार नसून त्यांचे नियमन केले जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: