Home /News /money /

सरकार क्रिप्टोकरन्सी जीएसटी कायद्यांतर्गत आणण्याची शक्यता, ट्रान्जॅक्शन वॅल्यूबाबत पेच कायम

सरकार क्रिप्टोकरन्सी जीएसटी कायद्यांतर्गत आणण्याची शक्यता, ट्रान्जॅक्शन वॅल्यूबाबत पेच कायम

केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 ने क्रिप्टो मालमत्तेवर आयकर लादण्याबाबत काही स्पष्टता आणली आहे. क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी सरकार वेगळ्या कायद्यावर काम करत आहे, परंतु अद्याप कोणताही मसुदा सार्वजनिक करण्यात आलेला नाही.

    मुंबई, 20 मार्च : केंद्र सरकार GST कायद्यांतर्गत क्रिप्टोकरन्सीचे वर्गीकरण करण्याचा विचार करत आहे, जेणेकरून व्यवहाराच्या पूर्ण मूल्यावर कर आकारता येईल. सध्या, क्रिप्टो एक्सचेंजेसद्वारे (Crypto Exchage) दिलेल्या सेवांवर वस्तू आणि सेवा कर (GST) आकारला जातो आणि तो आर्थिक सेवांच्या श्रेणीमध्ये ठेवला जातो. क्रिप्टोकरन्सी लॉटरीप्रमाणे जीएसटी अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की क्रिप्टो कोणत्याही लॉटरी, कॅसिनो, सट्टेबाजी, जुगार, घोड्यांच्या शर्यतीसारखेच आहे, ज्याच्या संपूर्ण मूल्यावर 28 टक्के जीएसटी लागू आहे. याशिवाय, सोन्याच्या बाबतीत, संपूर्ण व्यवहार मूल्यावर 3 टक्के GST आकारला जातो. Supermarket Strategy: सुपरमार्केटमध्ये असा कापला जातो तुमचा खिसा कसा आणि तुम्हाला कळतंही नाही संपूर्ण व्यवहार मूल्यावर जीएसटी आकारला जावा का? एका अधिकाऱ्याने सांगितले की, क्रिप्टोकरन्सीवर जीएसटी आकारण्याबाबत स्पष्टतेची गरज आहे आणि आम्ही ते पूर्ण मूल्याने आकारले जावे की नाही आणि क्रिप्टोकरन्सी वस्तू आणि सेवा म्हणून वर्गीकृत करता येतील का यावर विचार करत आहोत. आणखी एका जीएसटी अधिकाऱ्याने सांगितले की, जर क्रिप्टोकरन्सीच्या संपूर्ण व्यवहारावर जीएसटी आकारला गेला, तर हा दर 0.1-1 टक्क्यांच्या दरम्यान असू शकतो. मात्र आधी वर्गीकरणाचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यानंतर दराबाबत चर्चा होईल. Multibagger Stock: आठ वर्षात 10 हजार बनले 60 लाख, आता पुन्हा का चर्चेत आहे 'हा' केमिकल स्टॉक? केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 ने क्रिप्टो मालमत्तेवर आयकर लादण्याबाबत काही स्पष्टता आणली आहे. क्रिप्टोकरन्सीचे नियमन करण्यासाठी सरकार वेगळ्या कायद्यावर काम करत आहे, परंतु अद्याप कोणताही मसुदा सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Cryptocurrency, GST, Tax

    पुढील बातम्या