नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : इस्लाम धर्मातल्या नागरिकांना कित्येक नियम पाळावे लागतात. आपल्या धर्मामध्ये कोणती गोष्ट चांगली आहे आणि कोणती वाईट याबाबत त्यांचे नियम ठरलेले आहेत. यासोबतच कित्येक वेळा त्यांचे धर्मगुरू विविध फतव्यांमार्फत विविध नियम जाहीर करत असतात. आता इंडोनेशियाच्या नॅशनल उलेमा काउन्सिलने (National Ulema council) क्रिप्टोकरन्सी इस्लामदृष्ट्या हराम (Crypto currency Haram in Islam) असल्याचं जाहीर केलं आहे. या काउन्सिलच्या मते यामध्ये अनिश्चितता आणि नुकसानकारक तत्त्वं असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, क्रिप्टो व्यवहार करण्यासाठी त्यांनी एक अटही ठेवली आहे.
गुरुवारी (11 नोव्हेंबर) या परिषदेच्या बैठकीनंतर क्रिप्टोला हराम (Crypto Haram) मानण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक नियम प्रमुख असरून नियाम शोलेह यांनी याबाबत घोषणा केली. यासोबतच मुस्लिम व्यक्तीने क्रिप्टोकरन्सीमध्ये (Crypto and Islam) व्यवहार कसा करावा, याबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एखादी व्यक्ती क्रिप्टोकरन्सीमध्ये शरिया नियमांचं (Sharia rules for crypto) पालन करत असेल आणि मिळालेला नफा स्पष्टपणे दाखवू शकत असेल, तर त्या व्यक्तीला क्रिप्टो व्यवहार करण्याची परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अर्थात, क्रिप्टोला हराम ठरवल्यामुळे इंडोनेशियातले क्रिप्टो व्यवहार (Crypto business in Indonesia) बंद होतील असं नाही. उलेमा काउन्सिल (Indonesia Ulema Council) ही इंडोनेशियामधल्या शरिया नियमांच्या पालनावर देखरेख ठेवते. यासोबतच ही काउन्सिल अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय बँकांना इस्लामिक मुद्द्यांबाबत सल्ले देते; पण देशात क्रिप्टोकरन्सी बंद करायची की नाही याबाबत केवळ सरकारच निर्णय घेऊ शकतं.
हे ही वाचा-8 रुपयांचा शेअर पोहोचला ₹1090 वर, 1 लाखांचे बनले 1 कोटी रुपयांपेक्षाही जास्त!
इंडोनेशियामध्ये वर्षाच्या सुरुवातीच्या पाच महिन्यांमध्ये तब्बल 370 ट्रिलियन रुपयांचे (26 बिलियन डॉलर्स) क्रिप्टो व्यवहार झाले. जगभरातली क्रिप्टो बाजारपेठ तब्बल 3 ट्रिलियन डॉलर्स आहे. इतर इस्लामिक देशांबाबत बोलायचं झाल्यास, यूएईने दुबईमध्ये क्रिप्टो ट्रेडिंग करण्यास परवानगी दिली आहे. बहारीनने 2019 मध्येच क्रिप्टो करन्सीला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं.
इंडोनेशियाचं सरकार क्रिप्टो व्यवहारांना पाठिंबा देतं. त्यामुळे देशातल्या नागरिकांना कमोडिटी फ्युचर्ससोबत गुंतवणूक करून क्रिप्टो व्यवहार करण्याची परवानगी आहे. यासोबतच, सरकार सध्या क्रिप्टोला चलन म्हणून वापरण्याची परवानगी देत नसलं, तरी इंडोनेशियामधली केंद्रीय बँक डिजिटल क्रिप्टो करन्सी आणण्याचा विचार करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cryptocurrency, Indonesia