Home /News /money /

Petrol Diesel Price Today: क्रूड ऑइल दरात चढ-उतार, तपासा मुंबईतील आजचा पेट्रोल-डिझेल भाव

Petrol Diesel Price Today: क्रूड ऑइल दरात चढ-उतार, तपासा मुंबईतील आजचा पेट्रोल-डिझेल भाव

File Photo

File Photo

आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सोमवारी (Petrol Diesel Price Today 17 January 2022) IOCL पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

    नवी दिल्ली, 17 जानेवारी : आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सोमवारी (Petrol Diesel Price Today 17 January 2022) IOCL पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज इंधन दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. किंमती आणि मागील काही काळ पाहता गेल्या 73 दिवसांत पेट्रोल-डिझेल दरात कोणताही बदल झालेला नाही. इंधन दरात 4 नोव्हेंबरपासून बदल झालेला नाही. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रति लीटरची कपात केली होती. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्याच्याच परिणाम देशात इंधन दर स्थिर आहे. आज दिल्लीत पेट्रोल 5.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. उत्पादन शुल्कात कपात होण्याआधी इंधन दर सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते.

    हे वाचा - दरमहा 10000 भरा अन् मिळवा 16 लाख रुपये, पोस्टाच्या योजनेबद्दल जाणून घ्या

    प्रमुख शहरात काय आहे आजचा भाव - - दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.

    हे वाचा - फक्त 330 रुपयांत 2 लाखांचे विमा संरक्षण! 'ही' आहे सरकारी योजना

    असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

    पुढील बातम्या