Home /News /money /

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर तपासा

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर तपासा

आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 116 डॉलर होती, जी एका दिवसापूर्वीच्या तुलनेत सुमारे 3 डॉलरने कमी आहे.

    मुंबई, 30 जून : तेल उत्पादक देशांच्या संघटनेने (ओपेक) पुरवठा वाढवण्याचे संकेत दिले आहेत, तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता असल्याने इंधनाचा वापर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारणांमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत 3 डॉलरने कमी झाली आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. आज सकाळी जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 116 डॉलर होती, जी एका दिवसापूर्वीच्या तुलनेत सुमारे 3 डॉलरने कमी आहे. दरम्यान आज जाहीर झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात सरकारी तेल कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. तेल कंपन्यांनी क्रूडच्या महागाईमुळे स्वतःचे नुकसान होत असल्याचे सांगितले आहे आणि इंधनाच्या किमती वाढवण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव आणला जात आहे. चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर >> मुंबई - पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर >> दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर >> चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर >> कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. तुम्ही नवीन दर याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMS द्वारे पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे (Indian Oil) ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या