Home /News /money /

Petrol -Diesel: कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं?

Petrol -Diesel: कच्च्या तेलाच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त की महागलं?

जागतिक बाजारात, ब्रेंट क्रूडची किंमत आज सकाळी प्रति बॅरल 109.7 डॉलर होती, तर यूएस क्रूड WTI प्रति बॅरल सुमारे 104 डॉलर विकले जात आहे.

    मुंबई, 23 जून : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असताना सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Prices) जाहीर केले. कंपन्यांना दीर्घ काळानंतर ब्रेंट क्रूड जागतिक बाजारात 110 डॉलरपेक्षा स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारात, ब्रेंट क्रूडची किंमत आज सकाळी प्रति बॅरल 109.7 डॉलर होती, तर यूएस क्रूड WTI प्रति बॅरल सुमारे 104 डॉलर विकले जात आहे. सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असताना आजही त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केला नाही. 6 एप्रिलपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. क्रूडने गेल्या आठवड्याच्या उच्चांकापेक्षा सुमारे 10 टक्के घसरण केली आहे. PPF खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढता येतात, किती होईल नुकसान? चेक करा प्रोसेस प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर >> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर >> दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर >> चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर >> कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत. LIC Saral Pension Yojna : फक्त एकदा पैसे भरा आणि दरमहा घ्या 12 हजार रूपये पेन्शन नवीन किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता तुम्ही SMSद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या