Home /News /money /

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर काय?

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर काय?

जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 116.3 डॉलर आणि WTI ची किंमत 110.6 डॉलरवर पोहोचली आहे. महागड्या कच्च्या तेलाचा दबाव सातत्याने वाढत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांचे म्हणणे आहे.

    मुंबई, 28 जून : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Price) गेल्या आठवड्यात घसरल्यानंतर पुन्हा वाढत आहेत. ब्रेंट क्रूड सध्या प्रति बॅरल 116 डॉलरच्या वर व्यवहार करत आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Prices) जाहीर केले. आजही, कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्ये बदल केलेला नाही, तर जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 116.3 डॉलर आणि WTI ची किंमत 110.6 डॉलरवर पोहोचली आहे. महागड्या कच्च्या तेलाचा दबाव सातत्याने वाढत असल्याचे पेट्रोलियम कंपन्यांचे म्हणणे आहे, मात्र जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केला जात नाही. दिल्लीत आजही पेट्रोल 96.72 रुपये आणि मुंबईत 111.35 रुपयांना विकले जात आहे. नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांसाठी काही दिवसात स्वस्तात फोन खरेदीची संधी? कंपन्या बंपर डिस्काऊंट देऊ शकतात देशातील प्रमुख शहरातील दर काय आहे? >> मुंबई - पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर >>दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर >> चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर >> कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर New Labour Code: नोकरी सोडल्यानंतर दोन दिवसात मिळणार फुल अँड फायनलचे पैसे, अजूनही अनेक फायदे सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात घरी बसून पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासायचे असतील तर एक सोपा उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून फक्त एक एसएमएस करावा लागेल. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या