मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील भाव

Petrol-Diesel Prices: तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी, चेक करा तुमच्या शहरातील भाव

गेल्या आठवड्यात सातत्याने घसरणीचा सामना करणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरात आता पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत 5 डॉलरने वाढून प्रति बॅरल 106 डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

    मुंबई, 19 जुलै : पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या दोन महिन्यांपासून कोणताही बदल झालेला नाही. आज देखील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. इंधनाच्या किमती एकाच पातळीवर आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीतही मोठा चढ उतार पाहायला मिळत आहे. सरकारने 21 मे रोजी उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले होते. क्रुड ऑईल महागलं काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने व्हॅट कमी केल्याने राज्यात पेट्रोल पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सातत्याने घसरणीचा सामना करणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरात आता पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत 5 डॉलरने वाढून प्रति बॅरल 106 डॉलरपर्यंत पोहोचली आहे. याच दरवाढीचा पेट्रोल डिझेलच्या किमतीवर काही परिणाम होतो का पाहावं लागेल. Income Tax: 'या' उत्पन्नावर आकारला जात नाही कोणताही कर, रिटर्न भरण्यापूर्वी घ्या समजून राज्यातील प्रमुख शहरांतील इंधनाचे दर >> मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर. >> पुणे - पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर >> नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर Post Office MIS: पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि दरमाह हमखास पैसे कमवा, काय आहे योजना? पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर कसे तपासता येतील? तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी 9224992249 या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक 9223112222 या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price

    पुढील बातम्या