बँक खात्यात पैसे नसतील तरीही करता येईल UPI पेमेंट, वाचा काय आहे ही प्रक्रिया

बँक खात्यात पैसे नसतील तरीही करता येईल UPI पेमेंट, वाचा काय आहे ही प्रक्रिया

युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface/UPI) एक रिअल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. तुम्ही भारतात उपलब्ध कोणत्याही UPI App मध्ये तुमचे बँक खाते लिंक करून युपीआय पेमेंट करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली,  23 ऑक्टोबर : युनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payment Interface/UPI) एक रिअल टाइम पेमेंट सिस्टिम आहे. तुम्ही भारतात उपलब्ध कोणत्याही UPI App मध्ये तुमचे बँक खाते लिंक करून युपीआय पेमेंट करू शकता. अर्थात ऑनलाइन किंवा ऑफलाइन मर्चंटला युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे असणे आवश्यक आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला असा पर्याय सांगणार आहोत, ज्यावरून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे नसले तरीही युपीआय पेमेंट करू शकता आणि कालांतराने तुम्ही हे पैसे परत करू शकता.

ICICI PayLater

आयसीआयसीआय बँकेच्या पे लेटर ( ICICI PayLater) सुविधेच्या माध्यमातून तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही संबंधित मर्चंटला पेमेंट करू शकता. ही सेवा जवळपास क्रेडिट कार्डप्रमाणे आहे. पे लेटर खात्याच्या माध्यमातून तुम्ही आधी पैसे देऊन त्यानंतर हे बँकेचे हे पैसे फेडू शकता.

ही सुविधा कुणाला मिळेल?

1. आयसीआयसीआय  बँक ग्राहकांना ही सुविधा मिळेल. तुम्ही  iMobile, पॉकेट्स वॉलेट  किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून ही सेवा सुरू करू शकता. ही खाते सुरू झाल्यानंतर तुम्हाला pl.mobilenumber@icici असा एक युपीआय  आयडी आणि एक पे लेटर अकाऊंट नंबर मिळेल. विशेष बाब म्हणजे तुम्ही या क्रेडिट सुविधेचा वापर केवळ वॉलेट्समधून नाही तर नेट बँकिंगच्या माध्यमातून देखील करू शकता.

2. ICICI PayLater च्या माध्यमातून कसे कराल पेमेंट?

युपीआय किंवा आयसीआयसीआय इंटरनेट बँकिंग स्विकारणाऱ्याच व्यापाऱ्याला तुम्ही या माध्यमातून पेमेंट करू शकता. युपीआयच्या माध्यमातून तुम्हाला Amazon, Paytm, Future Pay, Flipkart, PhonePe इ. सर्व ऑनलाइन मर्चंट्सना पेमेंट करता येईल. युपीआय कोड स्कॅन करून तुम्ही स्थानिक दुकानदारांना देखील पेमेंट करू शकता. PayLater खात्याच्या माध्यमातून तुम्ही क्रेडिट कार्ड बिल किंवा पर्सन टू पर्सन (P2P) पैसे ट्रान्सफर नाही करू शकत.

epaylater

अशाच प्रकारची सुविधा  epaylater या स्टार्टअपने आयडीएफसी बँकेसोबत (IDFC Bank) मिळून देऊ केली आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही काही निश्चित मर्चंट्सना पेमेंट करू शकता. UPI आयडी किंवा युपीआय क्यूआर कोड स्कॅन करून हे पेमेंट करता येईल. epaylater खाते कोणत्याही बँकेचा ग्राहक सुरू करू शकतो. दरम्यान कोरोना काळात या कंपनीने क्रेडिटची सुविधा बंद केली आहे.

Flexpay च्या ग्राहकांसाठी Scan Now and Pay Laterची सुविधा

हैदराबादमधील Vivifi India Finance ने फ्लेक्सपे (Flexpay) लाँच केले आहे. या माध्यमातून युपीआयवर क्रेडिट घेता येते. फ्लेक्सपेचे ग्राहक नंतर कंपनीचे पैसे फेडू शकतात.

Moneytap देत आहे cUPI सुविधा

फिनटेक कंपनी मनीटॅप देखील त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट ऑन युपीआयची सुविधा उपलब्ध करून देते आहे. कस्टमर या क्रेडिट लाइनचा वापर ऑनलाइन किंवा ऑफलाइन मर्चंटना युपीआय पेमेंट करताना करून शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 23, 2020, 9:38 AM IST
Tags: moneyupi

ताज्या बातम्या