सावधान! लाखो भारतीयांच्या डेबिट- क्रेडिट कार्ड डेटाची होतेय चोरी

सावधान! लाखो भारतीयांच्या डेबिट- क्रेडिट कार्ड डेटाची होतेय चोरी

देशभरातल्या सुमारे 12 लाख डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा डेटा लीक झाला आहे. एवढंच नाही तर या डेटाची ऑनलाइन विक्री होतेय.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : देशभरातल्या सुमारे 12 लाख डेबिट आणि क्रेडिट कार्डांचा डेटा लीक झाला आहे. एवढंच नाही तर या डेटाची ऑनलाइन विक्री होतेय. सिंगापूरमधल्या IB सिक्युरिटी रिसर्च टीमने डार्क वेबवर क्रेडिट आणि डेबिट कार्डांच्या एका डेटाबेसचा पर्दाफाश केला आहे. या कार्डांचा डेटा सिंगापूरमधला Joker’s Stash नावाच्या डार्कनेट मार्केट प्लेस वर विकला जातोय.

टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या बातमीनुसार, हॅकर्सच्या वेबसाइटवर जी माहिती दिली गेलीय त्यात 98 टक्के माहिती भारतीयांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डांबदद्ल आहे.

(हेही वाचा : या कारणांमुळे सोनं झालं एवढं महाग, हे आहेत आजचे दर)

ही सगळी कार्ड एकाच बँकेची नाहीत. त्यामुळे हे मोठ्या स्तरावरचं रॅकेट आहे, असं म्हणता येणार नाही, असं ZDNet च्या अहवालात म्हटलं आहे. 2016 मध्ये अशाच प्रकारे डेटाची चोरी झाली होती. त्यावेळी32 लाख डेबिट कार्डांचा तपशील चोरीला गेला होता. यात येस बँक, SBI यासह दुसऱ्या बँकांच्या क्रेडिट कार्डांचा समावेश होता. हे उघड झाल्यानंतर बँकांनी ग्राहकांना दुसरी क्रेडिट कार्ड दिली.

ही चोरी फक्त भारतीय बँकांच्या बाबतीत होते, असं नाही. यावर्षी फेब्रुवारीमध्ये 20 लाख अमेरिकी कार्डांचा डेटा चोरी झाल्याची बातमी आली होती. त्यामुळे जगभरातच डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह आहे.

===========================================================================================

VIDEO: राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

First published: October 31, 2019, 8:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading