मराठी बातम्या /बातम्या /मनी /Credit Card वापरताना काळजी घ्या, कंगाल होण्यापूर्वी या गोष्टी माहित करुन घ्या

Credit Card वापरताना काळजी घ्या, कंगाल होण्यापूर्वी या गोष्टी माहित करुन घ्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आपली फसवणूक होऊ नये म्हणून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 01 फेब्रुवारी : बहुतांश लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. यामुळे अनेकांना फायदा होतो. कारण ज्या लोकांकडे पैसे नाही असे लोक क्रेडिट कार्डचा वापरु करुन वस्तू विकत घेऊ शकतात किंवा बिल भरु शकतात आणि मग पैसे आल्यावर ते पुन्हा बँकेला पैसे देऊ शकतात. पण योग्य रितीने क्रेडिट कार्ड वापरला तरच तो तुमच्या फायद्याचा आहे. नाहीतर तो तुम्हाला नुकसानात देखील टाकू शकतो.

  तुम्ही पण क्रेडिट कार्ड वापरता का? जर उत्तर हो असेल, तर ते वापरताना काळजी घ्या, अन्यथा तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात.

  हे ही पाहा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं?

  जर तुम्ही शेवटच्या तारखेपर्यंत पेमेंट केले नाही तर बँक तुमच्यावर 30 ते 36 टक्के व्याज आकारते आणि अधिक विलंब शुल्क देखील घेते.

  त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये म्हणून क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

  उशीर झाल्यामुळे क्रेडिट कार्ड पेमेंटवर उच्च व्याजदर आणि पेमेंट डिफॉल्टसारख्या कर्जाच्या सापळ्यात अडकू शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला तुमचे बिल वेळेपूर्वी जमा करावे लागेल.

  सध्या, तुम्हाला क्रेडिट कार्डवर पैसे भरण्यासाठी 40-50 दिवसांचा विनामूल्य कालावधी मिळतो, परंतु असे न झाल्यास, हा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो. तसेच, तुम्ही एकाच बँकेचे बचत खाते आणि क्रेडिट कार्ड घेतले असले तरीही काळजी घेणे आवश्यक आहे.

  तुम्ही क्रेडिट कार्डवर वेळेवर पैसे न भरल्यास बँक तुमची रक्कम ब्लॉक करू शकते. असे झाल्यास, तुम्ही तुमच्या बँकेतून पैसे काढू शकणार नाही किंवा ते इतर कोणत्याही खात्यात हस्तांतरित करू शकणार नाही.

  तुम्ही क्रेडिट कार्डने शॉपिंग करत असाल तर तुमची ही सवय बदला.

  क्रेडिट कार्डच्या पेमेंटमध्ये चूक झाल्यास तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो आणि यामुळे तुम्ही फसवणुकीच्या लिस्टमध्ये याल. जर तुम्ही चुकून 2-3 महिने क्रेडिट कार्डचे बिल भरू शकत नसाल तर अशा परिस्थितीत तुमचे बँक खाते ब्लॉक होईल. जर तुम्ही क्रेडिट कार्डने खरेदी करत असाल तर तुमची ही सवय बदला, कारण यामुळे तुम्ही कर्जबाजारी होऊ शकता.

  दिलेल्या वेळेत बिल भरले नाही तर तुम्हाला तुमच्या खिशातून जास्त पैसे द्यावे लागतील. एवढेच नाही तर तुम्ही तुमची बचत आणि कष्टाचे पैसेही वाचवू शकत नाही. तुमचे बिल आल्यावर, ते भरण्यापूर्वी ते तपासा, अन्यथा तुमच्या नकळत अनेक शुल्क जोडले जाऊ शकतात.

  First published:

  Tags: Bank details, Credit card, Money, Social media, Viral