मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रिलायन्सची कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; Covid-19 ने मृत्यू झाल्यास 5 वर्ष कुटुंबीयांना मिळत राहील पगार

रिलायन्सची कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; Covid-19 ने मृत्यू झाल्यास 5 वर्ष कुटुंबीयांना मिळत राहील पगार

One Reliance Family असं जाहीर करत मुकेश आणि नीता अंबानी यांनी कोरोना काळात कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठीही मदतीचा हात पुढे केला आहे.

मुंबई, 2 जून: Coronavirus ने देशभर घातलेलं थैमान अद्याप आटोक्यात आलेलं नाही. अजूनही मृत्यूचे हादरवणारे  (Covid-19 deaths in India)आकडे समोर येत आहेत. महाराष्ट्रात तर एप्रिल आणि मे महिन्यात दर तासाला 28 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. एवढ्या कुटुंबांना कोविडची झळ बसली आहे. कोरोनामुळे कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी घेतला तर सगळं कुटुंब देशोधडीला लागतं. यासाठीच रिलायन्सने (Reliance Industries) आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कर्मचाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबीयांना पुढची पाच वर्षं त्या कर्मचाऱ्याचा शेवटच्या पगाराएवढी रक्कम मिळत राहील. तसंच त्या कर्मचाऱ्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च रिलायन्स उचलणार आहे. एवढंच नाही तर कुटुंबीयांचा म्हणजे जोडीदार आणि मुलं तसंच पालकांच्या हॉस्पिटलायझेशन पॉलिसीचा प्रीमिअम रिलायन्सच्या वतीने भरण्यात येईल. मुलांचं पदवीपर्यंतचं शिक्षण होईपर्यंत हा लाभ मिळेल, असं रिलायन्सच्या वतीने मुकेश आणि नीता अंबानी (Mukesh Ambani) यांनी जाहीर केलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे Diabetes चा धोका आहे का? संशोधनात समोर आली महत्त्वाची माहिती ऑफ रोल कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) वतीने आणखी मोठी घोषणा करण्यात आली आहे. थेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे कर्मचारी नसलेल्या ऑफ रोल कर्मचाऱ्यांपैकी कुणाचा कोरोनाने मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या आप्तांना (Nominee)10 लाखांची मदत देण्यात येणार आहे. ही मदत रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल, असं RF च्या प्रमुख नीता अंबानी यांनी सांगितलं.
First published:

Tags: Coronavirus, Mukesh ambani, Neeta ambani, Reliance, Reliance Industries

पुढील बातम्या