कोरोना काळात घरबसल्या पैसे मिळणार, ATM आता घरापर्यंत येणार

कोरोना काळात घरबसल्या पैसे मिळणार, ATM आता घरापर्यंत येणार

लॉकडाउनच्या(Lockdown) काळात संचारबंदी असल्यानं नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हतं. ग्रामीण भागात वाहतुकीची साधनं बंद असल्यानं नागरिकांची मोठी अडचण होत होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : भारतातील अनेक बँका एटीएम कार्डशिवाय एटीएममधून ATM transactions पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. यासाठी एक मोबाइल नंबर आणि पिन आवश्यक आहे. परंतु कल्पना करा की, आपल्याला एटीएम कार्ड(ATM Card) आणि मोबाईलच्या मदतीशिवाय पैसे काढता आले तर काय होईल? परंतु केरळमधील डाक विभागानं एक सेवा सुरु केली असून यामध्ये ग्राहकांना घरबसल्या पैसे मिळत आहेत. यामध्ये ग्राहकांना बँकेत जायचं नसून केवळ पोस्ट ऑफिस (Postal Department) विभागाकडे संपर्क केल्यास तुम्हाला हवी तितकी रक्कम घरबसल्या मिळणार आहे. ग्रामीण भागात या योजनेचा मोठा लाभ झाला असून नागरिकांना कोरोनाच्या(Corona Cases in Kerala) काळात याचा मोठा फायदा झाला होता.

लॉकडाउनच्या(Lockdown) काळात संचारबंदी असल्यानं नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हतं. ग्रामीण भागात वाहतुकीची साधनं बंद असल्यानं नागरिकांची मोठी अडचण होत होती. त्यामुळे केरळमध्ये पोस्ट ऑफिसने या योजनेद्वारे आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. याआधी देखील अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांना 1 दिवसात 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम घरबसल्या दिली होती. इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या काळात या सिस्टीममधून नागरिकांनी 380 कोटी रुपये काढले आहेत. त्यामुळे केरळमधील ज्या ग्रामीण भागात बँक सुविधा (Banking Service) मिळू शकत नाहीत त्या भागांत ही योजना नागरिकांसाठी उपयोगी ठरली. या योजनेमधून विविध बँकांमध्ये खातं असणारे नागरिक घरबसल्या पैसे मिळवू शकतात. आधार प्रणालीवर ही सेवा आधारित असून यासाठी तुम्हाला बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये देखील जाण्याची गरज नाही. पोस्टमन घरी तुम्हाला पैसे आणून देणार आहे.

हे वाचा-पोलीस कर्मचाऱ्याचा दारू पिऊन धिंगाणा, नशेमध्येच काढली महिलेची छेड, Video Viral

अशा पद्धतीने काम करते ही सिस्टीम

या पद्धतीमध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ पोस्ट ऑफिसच्या हेल्प लाईन नंबरवर फोन करून तुम्हाला हवी असणारी रक्कम सांगायची आहे. त्याचबरोबर जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये फोन करून देखील तुम्ही या सेवेची मागणी करू शकता. तुम्ही फोन करून बुकिंग केल्यानंतर पोस्टमन घरी येऊन तुम्हाला पैसे देतो. यासाठी पोस्टमनला तुम्हाला बँक अकाउंट नंबर, नाव, मोबाईल क्रमांक सांगायचा आहे. यानंतर त्याच्याकडं असणाऱ्या खास डिव्हाइसमध्ये ही माहिती भरल्यानंतर एक ओटीपी (OTP) येईल. हा ओटीपी दिल्यानंतर आधार कार्ड स्कॅन आणि फिंगरप्रिंट स्कॅन(Finger print Scan) करून तुमची ओळख पटवून द्यायची आहे. आधार कार्डमध्ये(Aadhar card Number) क्यूआर कोड स्कॅन करण्याची सुविधा देखील आहे. ही सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मागणी केलेली रक्कम पोस्टमन तुम्हाला देईल. पैसे दिल्यानंतर कोणत्याही प्रकारची पावती मिळत नसून मोबाईलवर मेसेजच्या माध्यमातून किती रक्कम वजा झाली आहे याची माहिती मिळणार आहे.

दरम्यान, या मेसेजमध्ये तुमची प्रोसेस पूर्ण करणाऱ्या एजंटचा नंबर देखील दिला जाणार आहे. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास त्याच्याशी संपर्क करू शकता. म्हणजेच तुम्हाला बँकेत किंवा पोस्टात जाण्याची गरज नसून एकप्रकारे एटीएम तुमच्या घरी चालत येते. कोरोनाच्या या संकटकाळात अनेकांनी याचा फायदा घेतला होता. त्यामुळं आता भविष्यात देखील अनेकजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामुळं तुमचा वेळ वाचणार असून बँकेत किंवा एटीएममध्ये जाण्याची देखील गरज भासणार नाही.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 21, 2020, 1:27 PM IST

ताज्या बातम्या