सोनं घेणं आवाक्याबाहेर होणार; येत्या काळात 80 हजार होण्याची शक्यता, हे आहे कारण

सोनं घेणं आवाक्याबाहेर होणार; येत्या काळात 80 हजार होण्याची शक्यता, हे आहे कारण

2021 वर्षाच्या अखेरीस सोन आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औंस जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 एप्रिल : जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगानं वाढत आहे. या व्हायरसमुळे मोठं आर्थिक संकट ओढावत असतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याला मोठी झळाळी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजार आणि बॉन्डमध्ये दिवसेंदिवस होणारी घट फायदा मिळवून देणारी नसल्यानं लोक आता सोन्यात गुंतवणूक करण्याकडे वळले आहेत. सोन्याच्या किमती वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या काळात 2021 पर्यंत सोनं 60-70 नाही तब्बल 80 हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे असा कयास व्यक्त केला जात आहे. 2021 वर्षाच्या अखेरीस सोन आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औंस जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सोन्याच्या वायद्यात मागणी वाढली आहे. शुक्रवारी वायदा व्यापारात सोन्याचे दर 315 रुपयांनी वाढले होते. सोन्याचे दर प्रति तोळा 46, 742 होते. 2021 वर्षाच्या अखेरपर्यंत हेच दर 80 हजारापर्यंत जाऊ शकतात. साधारण विचार केला तर येत्या दीड वर्षात सोन्याचे दर 75 टक्के वाढण्याची शक्यताा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात 1 हजार 750 डॉलर प्रति औंसने व्यवहार सुरू आहेत. सोन्यामध्ये वाढणारी गुंतवणूक आणि वायदा बाजारातील वाढती मागणी यामुळे सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे.

हे वाचा-कोरोनाच्या लढ्यात या मुख्यमंत्र्यांची रुग्णसेवा;वाढदिवशी बजावलं डॉक्टरचं कर्तव्य

येत्या काळात सोनं खरेदी करणं सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होणार आहे. आताच सोन्या-चांदीचे दर 42 हजार पार आहेत. तर येत्या दीड वर्षात 80 हजारापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केल्यानं महिला वर्गातही काहीसा नाराजीचा सूर आहे. सोन्याची वेगानं वाढणाऱ्या किंमतीमुळे सोन्याचे दागिने खरेदी करणं गृहिणी आणि लग्नसराईमध्ये बजेटबाहेर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा-VIDEO : 'चलती है क्या 9 से 12' वर सलमान जॅकलिनला डान्स स्टेप शिकवतो तेव्हा...

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 25, 2020, 9:05 AM IST

ताज्या बातम्या