मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरवाढीला लागला ब्रेक, काय आहेत आजचे दर?

मोठी बातमी! सोन्या चांदीच्या दरवाढीला लागला ब्रेक, काय आहेत आजचे दर?

तीन दिवसांत दुसऱ्यादा वायदा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 11 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरानं उच्चांक गाठला होता. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे दर 75 हजार पार करून आले. अशा स्थिती दिलासा देणारी बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात घसरणं झाल्याचं पाहायला मिळत आहे.

झपाट्यानं वाढणाऱ्या किंमतीला आज करकचून ब्रेक लागला असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 611 रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीचे दर तब्बल 1405 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर 55 हजार 515 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 73 हजार 608 रुपये किलो आहे.

काय आहेत सोन्या-चांदीचे नवे दर जाणून घ्या

7 ऑगस्ट - 24 कॅरेट सोनं- 56,126, 10 ऑगस्ट- 55, 515

7 ऑगस्ट - 23 कॅरेट सोनं- 55,901, 10 ऑगस्ट- 55, 293

7 ऑगस्ट - 22 कॅरेट सोनं- 51, 411, 10 ऑगस्ट- 50, 852

7 ऑगस्ट - 18 कॅरेट सोनं- 42, 095, 10 ऑगस्ट- 41, 636

हे वाचा-SBI ने 42 कोटी ग्राहकांसाठी सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा

तीन दिवसांत दुसऱ्यादा वायदा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव येत असल्यानं आता सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी हळूहळू लगबग सुरू होऊ लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे आता सोनं खरेदीला पुन्हा चांगेल दिवस येतील असा अंदाज आहे. येत्या काळात सोनं 80 हजारपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाजही सराफ बाजारात व्यक्त केला जात आहे.

कमोडिटी एक्सपर्ट्सच्या मते सोन्याच्या किंमती अशाच वाढत राहण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने अमेरिकन डॉलरमध्ये घसरण होत आहे, त्यानुसार स्पष्ट संकेत मिळत आहेत की सोन्याच्या किंमतीमध्ये होणारी वाढ सध्या तरी थांबणारी नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे.  आर्थिक स्थिती कमजोर झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत लवकरत सोन्याच्या किंमती 56 हजारांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 11, 2020, 11:26 AM IST

ताज्या बातम्या