सलग 5 दिवस किंमती वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, मंगळवारचे दर इथे वाचा

सलग 5 दिवस किंमती वाढल्यानंतर आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, मंगळवारचे दर इथे वाचा

5 दिवस सोन्याच्या किंमतीत सतत वाढ झाल्यानंतर आज सोनं उतरल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : 5 दिवस सोन्याच्या किंमतीत सतत वाढ झाल्यानंतर आज सोनं उतरल्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. MCX मध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत 1.34 टक्क्यांनी म्हणजेच 584 रुपयांनी घसरली आहे. त्यानंतर प्रति तोळा सोन्याची किंमत (gold prices today) 42 हजार 996 रुपये झाली आहे. गेल्या 5 दिवसांमध्ये सोन्याच्या किंमतीत जवळपास 3000 रुपयांची वाढ झाली होती. MCX मध्ये सोन्याच्या किंमतींनी 43 हजार 788 रुपयांचा नवा रेकॉर्ड रचला होता. मात्र आज सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. MCX मध्ये चांदीच्या किंमतीतही (Silver prices today) 1.6 टक्क्यांनी घसरण झाल्याने प्रति किलो चांदीची किंमत 48 हजार 580 रुपयांवर पोहोचली आहे.

(हेही वाचा-पोस्ट ऑफिसमध्ये बचत, PF किंवा सुकन्या खातं आहे? जाणून घ्या ही महत्त्वाची माहिती)

Coronavirus चा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. चीनमध्ये त्याचप्रमाणे आजुबाजुच्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत बचतीसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक वाढली आहे. या सगळ्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतींनी गेल्या सात वर्षातला उच्चांक गाठला. तर भारतात आतापर्यंतच्या सर्वात जास्त सोन्याच्या किंमतीची नोंद झाली. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 टक्क्यांनी घसरलं. स्पॉट गोल्ड (Spot Gold) ची किंमत 1 हजार 642.89 डॉलर पर्यंत घसरली. याआधी आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 1 हजार 688.66 डॉलरवर सोन्याची किंमत पोहोचली होती. चीनबाहेर देखील कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

(हेही वाचा-Coronavirusची स्मार्टफोनलाही होतेय बाधा, टीव्ही आणि फ्रीजवरही परिणाम)

इतर मौल्यवान धातूंच्या किंमतीवरही परिणाम झाला आहे

इतर मौल्यवान धातूंच्या किंमती

चांदीच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात 0.3 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 18.58 प्रति औंस पर्यंत चांदीची किंमत पोहोचली आहे. तर प्लॅटिनमची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढून 966.53 डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2020 01:17 PM IST

ताज्या बातम्या