Home /News /money /

सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे किंमत

सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहे किंमत

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय आहेत जाणून घ्या सविस्तर.

    मुंबई, 13 जून : अनलॉक 1 नंतर सोन्या-चांदीच्या दरात 12 व्या दिवशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्याचे दर उतरल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी बाजार उघडताच 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,513 होती तर संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्याचे 47,334 दर रुपये झाले. तर चांदी 949 रुपयांनी स्वस्त झाली आहे. एक किलो चांदीचा दर शुक्रवारी 47690 रुपये एवढा होता. दिल्लीत काय आहेत सोन्या-चांदीचे नवीन दर राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46,050 आहे तर चेन्नईमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,370 आहे. शुक्रवारी सराफ बाजार बंद होताना मुंबईत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,400 रुपये होती. आंतरराष्ट्रीय बाजापपेठेत सोन्याच्या किमतीला मात्र झळाळी आल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारी सोन्याची किंमत 1,734 डॉलर प्रति औंस होती तर चांदीची किंमतही 17.62 डॉलर प्रति औंसवर येत स्थिरावली आहे. हे वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांचा जीएसटीबाबत मोठा निर्णय भविष्यात सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे जगासमोर आर्थिक मंदीचे सावट आहे. जगभरातील अनेक केंद्रीय बँका व्याजदरामध्ये कपात करून अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक अत्यंत जोखमीची ठरू शकते. परिणामी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक असणाऱ्या सोन्याकडे अधिक प्रमाणात वळले आहेत. त्यांच्यासाठी गोल्ड इटीएफ, सॉव्हरेन गोल्ड यांसारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. बरेच जण सोन्यात गुंतवणूक करत असल्यानं या किंमती येत्या काळात मोठ्या प्रमाणत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वाचा-आता पराठ्यावर 18 टक्के जीएसटी; आनंद महिंद्रांनी अशी घेतली फिरकी हे वाचा-भारतातील कोरोना रुग्णांनी पार केला 3 लाखाचा टप्पा, पुन्हा रेकॉर्डब्रेक वाढ संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Money

    पुढील बातम्या