Corona Impact: एप्रिल-नोव्हेंबर 2020 मध्ये सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची घसरण

Corona Impact: एप्रिल-नोव्हेंबर 2020 मध्ये सोन्याच्या आयातीत 40 टक्क्यांची घसरण

भारत सोन्याची सर्वात मोठी आयात करणारा देश आहे. देशातील दागिन्यांच्या उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोन्याची आयात केली जाते. वार्षिक सोन्याची आयात 800 ते 900 टनपर्यंत असते.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : कोरोना काळात (Coronavirus Crisis) देशात लाखो लोकांचे जॉब (Job Loss) गेले. कोट्यवधींचा रोजगार ठप्प झाला. याचा लोकांच्या खरेदी क्षमतेवर (Purchasing Power) मोठा परिणाम झाला. या काळात सर्वसामान्यांचा सोने खरेदीकडील कल कमी आणि मौल्यवान पिवळ्या धातूच्या मागणीवरही (Domestic Demand)त्याचा परिणाम झाला. त्यामुळे एप्रिल-नोव्हेंबर 2020 दरम्यान देशात सोन्याची आयात (Gold Import) 40 टक्क्यांनी घसरली. सोन्याच्या आयातीचा परिणाम चालू खात्याच्या तूटीवरही (Current Account Deficit) होतो.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, आर्थिक वर्ष 2019-20 काळात सोन्याची आयात 20.6 अब्ज डॉलर होती. नोव्हेंबर 2020 मध्ये वार्षिक आधारावर सोन्याची आयात 2.65 टक्क्यांनी वाढून 3 अब्ज डॉलर झाली. चांदीची आयातही एप्रिल-नोव्हेंबर 2020 दरम्यान 65.7 टक्क्यांनी घसरून 75.2 कोटी डॉलर झाली.

सोन्या-चांदीच्या आयातीत झालेल्या घसरणीमुळे एप्रिल-नोव्हेंबर 2020 मध्ये देशातील व्यापार तूट 42 अब्ज डॉलर्सपर्यंत मार्यादित होती. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ती 113.42 अब्ज डॉलर्स होती.

भारत सोन्याची सर्वात मोठी आयात करणारा देश आहे. देशातील दागिन्यांच्या उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोन्याची आयात केली जाते. वार्षिक सोन्याची आयात 800 ते 900 टनपर्यंत असते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात दागिन्यांची निर्यात 44 टक्क्यांनी घसरली.

नोव्हेंबर महिन्यात देशाच्या निर्यातीत 8.74 टक्के घसरण झाली. तर आयातीतही 13.31 टक्क्यांची घसरण झाली. पेट्रोलियम, इंजिनियरिंग, केमिकल, जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रातील निर्यातीत घसरण झाल्याने एकूण निर्यातीवरही परिणाम झाला असून त्यातही मोठी घट झाली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: December 21, 2020, 9:15 AM IST

ताज्या बातम्या