Home /News /money /

भाजीपाल्यामुळे महागाईचा विक्रमी भडका, गेल्या 5 वर्षांत सर्वाधिक वाढ

भाजीपाल्यामुळे महागाईचा विक्रमी भडका, गेल्या 5 वर्षांत सर्वाधिक वाढ

सर्वसामान्यांना कांद्याच्या दराने रडवल्यानंतर भाजीपाल्यानेही गेल्या महिन्यात खिशाला कात्री लावली.

    नवी दिल्ली, 14 जानेवारी : सर्वसामान्यांना कांद्याच्या दराने रडवल्यानंतर भाजीपाल्यानेही गेल्या महिन्यात खिशाला कात्री लावली. डिसेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील महागाई दराचे आकडे केंद्राकडून जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या महिन्यात महागाईचा दर 7.35 टक्के इतका झाला आहे. खाद्य पदार्थ आणि तेलांच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर महागाई दरात ही वाढ झाली. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये महागाई दर 5.54 टक्के इतका होता. गेल्या वर्षी याच काळात हा दर 2.19 टक्के होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा महागाई दर 4 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. नोव्हेंबरमध्ये तीन वर्षांचा उच्चांक गाठत महागाई दर 5.54 टक्क्यांवर पोहोचला होता. जुलै 2016 मध्ये ग्राहक मुल्य निर्देशांक 6.07 टक्के इतका होता. भाज्यांच्या किंमती डिसेंबरमध्ये गगनाला भिडल्या होत्या. कांद्याच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर सर्वसामन्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. डिसेंबर महिन्यात भाजीपाल्याच्या किंमतीत 60.5 टक्के वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये हीच वाढ 36 टक्के होती. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. तेव्हा बँकेनं म्हटलं होतं की, अंदाजापेक्षा महागाई जास्त आहे. वाचा : बजेटनंतर स्वस्त होऊ शकतं सोनं, सरकारला दिला हा सल्ला डिसेंबरमध्ये डाळींच्या किंमतीत प्रत्येक महिन्यानुसार 15.44 टक्के वाढले. नोव्हेंबरमध्ये ही वाढ 13.94 टक्के इतकी होती. कपडे, चपला यामध्येही महागाईचा दणका बसला आहे. नोव्हेंबरमध्ये 1.30 टक्क्यांवरून डिसेंबर महिन्यात 1.50 टक्क्यांवर पोहचली होती. धान्य बाजारात महागाई नोव्हेंबर महिन्यात 3.71 टक्के होती. ती डिसेंबरमध्ये 4.36 टक्क्यांवर पोहोचली होती. वाचा : आर्थिक मंदीचा फटका, यावर्षी कमी होणार 16 लाख नोकऱ्या
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Rbi

    पुढील बातम्या