अलर्ट! 31 मार्चपर्यंत पूर्ण करा ही 4 कामं, अन्यथा बसणार आर्थिक फटका

अलर्ट! 31 मार्चपर्यंत पूर्ण करा ही 4 कामं, अन्यथा बसणार आर्थिक फटका

नवीन आर्थिक वर्षात (Financial Year) होणाऱ्या विविध बदलांचा तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याआधी ही कामं पूर्ण न केल्यास मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च : 31 मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक करण्याबरोबरच तुम्हाला अनेक कामं पूर्ण करायची आहेत. सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षामध्ये अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नवीन आर्थिक वर्षात (Financial Year) होणाऱ्या विविध बदलांचा तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम होणार आहे. जाणून घेऊयात या चार कामांबाबत जी तुम्हाला 31 मार्चपर्यंत पूर्ण करायची आहेत.

पॅन-आधार कार्ड (PAN-Aadhar Card) लिंक करणे

पॅन कार्ड आधार सोबत जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2020 आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून नागरिकांना इशारा देण्यात आला आहे की, 31 मार्चपर्यंत जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड (Pan Aadhaar Link Mandatory) नाही केलं, तर पॅन कार्ड संबंधित सर्व काम थांबवण्यात येतील आणि पॅन कार्डदेखील रद्द करण्यात येईल. कारण याआधीही आधार-पॅन लिंक करण्याची तारीख (PAN Aadhaar Link Deadline) अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख  31 मार्च आहे.

(हे वाचा-पेन्शनसाठी LIC ची खास योजना! एकदा गुंतवणूक केल्यानंतर दरमहा होणार भरभक्कम फायदा)

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चनंतर सुद्धा तुमचं पॅन कार्ड आधारसोबत जोडता येईल, मात्र जोपर्यंत तुम्ही लिंकिगची प्रक्रिया पूर्ण करणार नाही तोपर्यंत तुमचं पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह अर्थात निष्क्रिय राहील.

आर्थिक वर्षासाठी टॅक्स रिटर्न फाइल करणे

चालू आर्थिक वर्षात टॅक्स रिटर्न फाइल करण्याची डेडलाइन 31 जुलै 2019 होती. त्यानंतर ही डेडलाइन महिनाभर वाढवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ही डेडलाइन 31 डिसेंबर 2019 करण्यात आली. त्यानंतर शेवटची डेडलाइन 31 मार्च 2020 ठरवण्यात आली आहे. इनकम टॅक्स उशिरा फाइल केल्यास दंड बसू शकेल.

पीएम आवास योजनेअंतर्गत सबसिडी

सरकारच्या पीएम आवास योजनेअंतर्गत तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर 31 मार्चआधीच यासाठी अप्लाय करा. या योजनेअंतर्गत शहरी स्कीममध्ये जे लोकं पहिल्यांदा घर खरेदी करणार आहेत, त्यांना गृहकर्ज घेताना क्रेडिट-लिंक्ड व्याज सबसिडी मिळेल. ही योजना चार इनकम कॅटेगरी मध्ये लागू होते - आर्थिक कमजोर (EWS), लो इनकम ग्रुप (LIG), मिडल इनकम ग्रुप-1 (MIG I) आणि मिडल इनकम ग्रुप-1II (MIG II).

(हे वाचा- मोदी सरकारच्या निर्णयामुळे खिशाला चाप! पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढणार)

यामध्ये EWS और LIG कॅटेगरीमध्ये येणारे लोक या योजनेचा फायदा 31 मार्च 2022 पर्यंत घेऊ शकतील मात्र इतर दोन विभागांमधील नागरिकांना या महिन्याअखेरच हे काम पूर्ण करावं लागेल.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेमध्ये गुंतवणूक

31 मार्च 2020 प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. 60 वर्षांच्या आणि त्याहून जास्त वय असणाऱ्या नागरिकांच्या या पेन्शनसाठी ही योजना आहे.

First published: March 14, 2020, 5:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या