मराठी बातम्या /बातम्या /मनी /

येत्या 30 नोव्हेंबर आधी 'ही' कामे करुन घ्या, अन्यथा पैसे अडकून पडतील

येत्या 30 नोव्हेंबर आधी 'ही' कामे करुन घ्या, अन्यथा पैसे अडकून पडतील

एलआयसी हाऊसिंगच्या गृहकर्ज ऑफर (LIC Housing Home loan Offer ), पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र (Pensioner Life Certificate) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (Employees Provident Fund) UAN संबंधित काही काम फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत करता येतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 28 नोव्हेंबर : नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यात आज रविवार असल्याने अनेक कामे करता येत नाहीत. मात्र, काही कामे ऑनलाइन करता येतात. म्हणूनच 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत तुम्ही काही महत्त्वाचे काम पूर्ण करून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचे पैसे अडकण्यापासून वाचतील. 30 नोव्हेंबरपूर्वी तुम्हाला कोणती कामे करायची आहेत ते आम्ही तुम्हाला सांगतो.

नोव्हेंबर महिना आर्थिक आघाडीवर खूप महत्त्वाचा आहे. या महिन्याचे उरलेले दिवस सर्व वयोगटातील लोकांसाठी खूप महत्वाचे आहेत. वास्तविक, एलआयसी हाऊसिंगच्या गृहकर्ज ऑफर (LIC Housing Home loan Offer ), पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र (Pensioner Life Certificate) आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (Employees Provident Fund) UAN संबंधित काही काम फक्त 30 नोव्हेंबरपर्यंत करता येतील. या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही हे काम पूर्ण न केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान (Financial Loss) सहन करावे लागू शकते.

पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र लवकर सादर करावे

पेन्शनधारकांना दरवर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. याद्वारे संस्था पेन्शनधारक जिवंत असल्याची खात्री करतात. अशा परिस्थितीत तुम्ही पेन्शनधारक असाल आणि तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल तर हे काम 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा तुमची पेन्शन थांबू शकते. मात्र कर्मचारी पेन्शन योजनाशी (EPS) संबंधित निवृत्तीवेतनधारक वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सबमिट करू शकता. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाले तर, जर तुम्ही जानेवारी 2021 मध्ये जीवन प्रमाणपत्र सादर केले असेल तर आता ते सबमिट करण्याची गरज नाही.

डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, इथे तपासा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

परवडणाऱ्या दरात गृहकर्जासाठी अर्ज करा

भारतीय आयुर्विमा महामंडळाचे LIC हाऊसिंग फायनान्स 2 कोटी रुपयांपर्यंतच्या गृहकर्जासाठी 6.66 टक्के सवलतीचे दर देत आहे. त्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 आहे. तुम्हालाही एलआयसी हाऊसिंगकडून स्वस्त दरात गृहकर्ज घ्यायचे असेल, तर दोन दिवसांत अर्ज करा. हा दर CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक असलेल्या सर्व कर्जदारांना लागू आहे, त्यांचा व्यवसाय कोणताही असो. याशिवाय कंपनी प्रोसेसिंग फीमध्येही सूट देत आहे.

राकेश झुनझुनवालांचा या स्टॉकमुळे 753 कोटींचा तोटा, तुमच्याकडेही आहे हा शेअर?

UAN आधार लिंक करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने (EPFO) युनिक अकाऊंट नंबर आणि आधार (UAN Aadhaar Link) लिंक करण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ते 31 ऑगस्ट 2021 पर्यंत होते. EPFO वेबसाईट UMANG अॅप, EPFO ​​च्या e-KYC पोर्टलद्वारे OTP पडताळणी आणि बायोमेट्रिक क्रेडेन्शियल्सद्वारे आधार UAN शी लिंक केले जाऊ शकते. त्याच वेळी तुम्ही EPFO ​​कार्यालयात जाऊन देखील हे काम सोडवू शकता.

First published:

Tags: Money, Pension, बँक