Home /News /money /

Amazon ला मोठा झटका! ठोठावला 200 कोटींचा दंड, काय आहे कारण?

Amazon ला मोठा झटका! ठोठावला 200 कोटींचा दंड, काय आहे कारण?

Amazon

Amazon

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला (Amazon) मोठा दणका दिला आहे. करार रद्द करत 200 कोटींचा दंड ठोठावला आहे .

    नवी दिल्ली, 20 डिसेंबर : भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला (Amazon) मोठा दणका दिला आहे. नियमांचे उल्लंघन आणि खोटी विधाने केल्याचा ठपका ठेवत अ‍ॅमेझॉनला 200 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, अ‍ॅमेझॉन फ्यूचर कूपन्ससोबतच्या (Amazon Future Coupons) करारासाठी संमती रद्द केली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये, भारतीय स्पर्धा आयोगाने अ‍ॅमेझॉनला फ्युचर कूपनमधील 49 टक्के भाग खरेदी करण्याची परवानगी दिली होती. मात्र आता सीसीआयने आपला निर्णय मागे घेत परवानगी तूर्तास स्थगित राहणार असल्याचे सांगितले आहे. तसेच 200 कोटी रुपयांचा दंडदेखील ठोठवण्यात आला आहे.  अ‍ॅमेझॉनने 2019 मध्ये फ्यूचर समूहाबरोबर केलेल्या करारामागील ‘वास्तविक हेतू आणि तपशील’ दडवून ठेवले, जे या कराराला मंजुरी मिळविताना पुढे आणणे अत्यावश्यक असते. वास्तवाची अशा रीतीने दडपणूक करून खोटे चित्र स्थापित केले गेले, असा सुस्पष्ट ठपका स्पर्धा आयोगाने ५७ पानी आदेशात अ‍ॅमेझॉनवर ठेवला आहे. यामुळे त्या कराराची नव्याने तपासणी करणे आवश्यक आहे आणि तोवर त्याला पूर्वी दिली गेलेली मान्यता ‘तहकूब’ करीत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यासाठी CCI ला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. याआधी, CAIT ने CCI विरुद्ध जनहित याचिका देखील दाखल केली होती, त्यात असे म्हटले होते की, त्यांनी अ‍ॅमेझॉन कंपनीला जून महिन्यामध्येच कारणे दाखवा नोटीस जारी केली होती, परंतु अद्याप त्यावर कोणताही उत्तर देण्यात आलेले नाही. हे ही वाचा-Amazon म्हणजे ‘डबल 420’, CAIT ने केली तातडीच्या कारवाईची मागणी काय आहे प्रकरण?  फ्युचर रिटेल लिमिटेडच्या (Future Retail Limited) स्वतंत्र संचालकांनी नुकतीच CCI कडे याचिका दाखल केली होती. त्यात म्हटले आहे की, CCI ने 2019 मध्ये फ्युचर कूपनमधील गुंतवणुकीसाठी अ‍ॅमेझॉनला दिलेली मान्यता रद्द करावी. CCIकडून परवानगी घेताना अ‍ॅमेझॉन कंपनीने चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.  फ्युचर ग्रुपने रिलायन्स इंडस्ट्रीजला आपला रिटेल, वेअरहाऊसिंग आणि लॉजिस्टिक व्यवसाय सुमारे 24 हजार कोटी रुपयांना विकण्याचा करार केला होता. त्यावेळी म्हणजेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीने फ्यूचर रिटेलची प्रमोटर कंपनी फ्यूचर कूपन प्रायव्हेटमध्ये 49 टक्के भागभांडवल विकत घेतल्याचे सांगून करारामध्ये आक्षेप घेतला होता.  अशा परिस्थितीत रिलायन्ससोबत (Reliance) करार करण्यापूर्वी फ्युचर ग्रुपने अ‍ॅमेझॉनची परवानगी घ्यायला हवी होती.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Amazon

    पुढील बातम्या