नोकरी सोडताना नोटीस पीरिएड पूर्ण न केल्यास होईल नुकसान, कापले जाणार पैसे

नोकरी सोडताना नोटीस पीरिएड पूर्ण न केल्यास होईल नुकसान, कापले जाणार पैसे

जीएसटी अथॉरिटीच्या निर्णयानुसार जर कोणत्याही कर्मचाऱ्याने नोटीस पीरिएड पूर्ण करण्यापूर्वी नोकरी सोडली तर त्याच्या फूल अँड फायनल पेमेंट (F&F Payments) मधील 18 टक्के जीएसटी कापला जाऊ शकतो.

  • Share this:

अहमदाबाद, 14 जानेवारी: जीएसटी प्राधिकरणाच्या (GST Authority) निर्णयानुसार जर कोणत्याही कर्मचाऱ्याने नोटीस पीरिएड पूर्ण करण्यापूर्वी नोकरी सोडली तर त्याच्या फूल अँड फायनल पेमेंट (Full and Final Payments) 18% वरून जीएसटी वजा केला जाऊ शकतो. मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, आता सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी सोडताना नोटीस पीरिएड पूर्ण करावा लागेल. अन्यथा तुमच्या एफ अँड एफमधून मोठी रक्कम वजा केली जाईल. हा निर्णय गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रूलिंगने घेतला आहे. हे संपूर्ण प्रकरण अहमदाबादमधील एका कंपनीशी संबंधित आहे. या प्रकरणाची सुरुवात एक्सपोर्ट कंपनी एमनील फार्मा (Amneal Pharma) एका कर्मचार्‍यापासून झाली. कंपनीच्या कर्मचार्‍याने तीन महिन्यांच्या नोटीसी पीरिएड न पूर्ण करता नोकरी सोडली, त्यावेळी ही बाब लक्षात आली.

जीएसटी प्राधिकरणाने घेतला हा निर्णय घेतला

या प्रकरणानंतर जीएसटी प्राधिकरणाने आपल्या निर्णयामध्ये म्हटले आहे की ही रक्कम जीएसटी कायद्यांतर्गत येणाऱ्या एम्प्लॉयी एग्झम्पशन (कर्मचारी सूट) अंतर्गत नाही, म्हणून नोटीसची मुदत पूर्ण न केल्यास  18% जीएसटी द्यावा लागेल.

(हे वाचा- COVID-19 Vaccine: सध्या बाजारात नाही मिळणार कोरोना लस, NITI आयोगाचं स्पष्टीकरण)

नियुक्तीवेळी मिळणाऱ्या पत्रात दिली जाते माहिती. 

कोणत्याही कर्मचार्‍यांना नोकरीवर ठेवत असताना, त्यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात नोटीस कालावधीची संपूर्ण माहिती दिली जाते. नोटीसचा कालावधी किती आहे, नोकरी सोडण्यापूर्वी कर्मचार्‍याला तितक्या दिवस आधी राजीनामा द्यावा लागतो. नोटीस पीरिएड पूर्ण झाल्यानंतरच अधिकृतरीत्या तुम्ही कंपनी सोडू शकता.

(हे वाचा- Gold Price: मकर संक्रातीला स्वस्त झालं सोनंचांदी, इथे तपासा काय आहेत आजचे भाव)

आता लागू होणार हा नियम

जर कोणत्याही कर्मचार्‍याचा नोटीस कालावधी 3 महिन्यांचा असेल आणि त्याने राजीनामा दिल्यानंतर केवळ 2 महिने काम केले तर उर्वरित एका महिन्याच्या पगारामधून 18% जीएसटी वजा केला जाईल. म्हणजेच, जर एखाद्या कर्मचाऱ्याच पगार मासिक 50,000 रुपये असेल, तर Gujarat Authority of Advance Ruling च्या  या निर्णयानुसार कर्मचार्‍याच्या एका महिन्याच्या पगारासह 18 टक्के जीएसटी  कापला जाईल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 14, 2021, 4:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading