मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Colgate Q2 Result : कोलगेटला 270 कोटींचा नफा, स्टॉक Buy-Sell बाबत तज्ज्ञांचं मतं काय?

Colgate Q2 Result : कोलगेटला 270 कोटींचा नफा, स्टॉक Buy-Sell बाबत तज्ज्ञांचं मतं काय?

कोलगेटने (Colgate Q2 Result profit) 2021-22 च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 269.2 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 26 ऑक्टोबर : दुसऱ्या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. कोलगेटने देखील (Colgate Q2 Result) आपल्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल जारी केला आहे. कोलगेटने 2021-22 च्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 269.2 कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. ज्याचा अंदाज 285 कोटी रुपयांचा होता. कंपनीचे उत्पन्न 1,368 कोटी रुपये राहण्याचा अंदाज होता, मात्र उत्पन्न 1,352.4 कोटी रुपये राहिले.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीत कोलगेटचा EBITDA 400.7 कोटी आहे. तर 422 कोटी रुपयांच्या अंदाज वर्तवण्यात आला होता. कंपनीचे EBITDA मार्जिन 31 टक्के राहण्याचा अंदाज होता जेकी 29.6 टक्के आहे.

CREDIT SUISSE ने COLGATE ला आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे आणि स्टॉकसाठीचं टार्गेट 1890 वरुन 1750 केलं आहे. Lower Gross Margin साठी FY22-24 Earning 5 टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. त्याची व्हॉल्यूम ग्रोथ 4 टक्के राहण्याची शक्यता आहे. त्याची प्राईज ग्रोथ 1 राहिली, जी अपेक्षेपेक्षा कमी आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार खास! ऑक्टोबरच्या पगारात मिळणार हे 3 भत्ते, वाचा किती जास्त मिळेल Salary?

CLSA ने COLGATE वर आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे आणि टार्गेट 1940 रुपयांवरुन 1735 रुपये केलं आहे. कंपनीचा दुसरा Q2 कमकुवत होता कारण विक्री 5 टक्क्यांनी वाढली होती. EBITDA आणि PAT दोन्ही 2 टक्क्यांनी खाली होते. त्याची व्हॉल्यूम ग्रोथ 4.5 टक्के इतकी होती.

HDFC Bank Festive Treats सोबत या दिवाळीत करा कमी ईएमआयवर मोठी खरेदी

GOLDMAN SACHS ने COLGATE वर न्युट्रल रेटिंग दिले आहे. शेअरसाठी Rs 1,635 चे टार्गेट दिले आहे. मार्जिन अपेक्षेपेक्षा कमकुवत आहे. FY22-24 साठी EPS Estimates -2 टक्के ते -5 टक्क्याचा अंदाज दिला आहे.

First published: