मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Coca Cola बॉटल्स पाहून भडकला रोनाल्डो, पाणी पिण्याच्या सल्ल्यानंतर कंपनीनं झटक्यात गमावले 29323 कोटी; पाहा VIDEO

Coca Cola बॉटल्स पाहून भडकला रोनाल्डो, पाणी पिण्याच्या सल्ल्यानंतर कंपनीनं झटक्यात गमावले 29323 कोटी; पाहा VIDEO

क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) एका कृतीमुळे कोका कोलाला (Coca Cola) कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. थोडेथोडके नव्हे तर 4 बिलियन डॉलर्सचा तोटा झाला आहे. (Photo: Reuters)

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 16 जून: क्रिस्टियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) एका कृतीमुळे कोका कोलाला (Coca Cola) कोट्यवधींच्या नुकसानाचा सामना करावा लागत आहे. थोडेथोडके नव्हे तर 4 बिलियन डॉलर्सचा (4 Billion Dollars) तोटा झाला आहे. भारतीय रुपयामध्ये ही किंमत 29000 कोटींपेक्षा जास्त आहे. फुटबॉल विश्वात रोनाल्डोचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, दरम्यान रोनाल्डोने आता कोका कोलाला मोठा झटका दिला आहे. यूरो कप 2020 (UEFA Euro 2020) टूर्नामेंटवेळी झालेल्या प्रेस कॉन्फरन्स दरम्यान ही घटना घडली आहे. रोनाल्डोने कोणता करार तोडला नाही किंवा त्याने कंपनीला धोका दिला नाही. रोनाल्डोने केवळ कोका कोलाच्या दोन बॉटल्स डेस्कवरून बाजूला सारत त्याच्याक कृतीतून केवळ पाणी पिण्याचा सल्ला दिला. सॉफ्ट ड्रिंक न पिण्याच्या त्याच्या सल्ल्याने कोका कोलाच्या शेअर्समध्ये हंगामा झाला आहे.

यूरो कपमध्ये 15 जून रोजी हंगेरीविरोधातील ग्रुप एफमध्ये पोर्तूगालच्या पहिल्या मॅचच्या आधी सोमवारी रोनाल्डोने बुडापेस्टच्या स्टेडियममध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी खुर्चीवर बसण्यापूर्वी त्याने समोर टेबलवर असणाऱ्या दोन कोका कोलाच्या बॉटल्स हटवल्या आणि त्याजागी पाण्याची बॉटल ठेवली. त्याने यावेळी पाणी पिण्याचा सल्ला दिला. Euro 2020 चे स्पॉन्सर असणाऱ्या कोकला यामुळे मोठा झटका बसला आहे. टूर्नामेंटमधील मोठ्या स्टार खेळाडूमुळे त्यांना या नुकसानाचा सामना करावा लागत आहे.

हे वाचा-Amazon चे जेफ बेझॉस स्वतःच्या यानातून चालले अंतराळात! कधी, कसे वाचा..

रोनाल्डो जगातील एक फिट खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सॉफ्ट ड्रिंकचं समर्थन त्याच्याकडून केलं जात नाही हेच त्याच्या कृतीतून स्पष्ट होत आहे. मात्र त्याच्या या कृतीमुळे कोका कोलाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. डेली स्टारच्या अहवालानुसार सोमवारी जेव्हा यूरोपमध्ये 3 वाजता स्टॉक मार्केट उघडले तेव्हा कोका कोलाच्या एका शेअरची किंमत 56.10 अमेरिकन डॉलर होती. यानंतर अर्ध्या तासाने रोनाल्डोचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स कोसळले.

कंपनीच्या शेअर्समध्ये 1.6 टक्क्यांची घसरण झाल्यानंतर काहीच वेळात शेअर्स 55.22 डॉलरवर आले. यानंतर कंपनीची किंमत 242 बिलियन डॉलरवरून 238 बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. अर्थात हे नुकसान 4 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 29323 कोटींपेक्षा जास्त नुकसान झालं आहे.

हे वाचा-डोनाल्ड ट्रम्पवर कुल्फी विकायची वेळ आली की काय? पाहा VIDEO आणि वाचा सत्य

रोनाल्डोने केवळ कोका कोलाला झटका दिला असे नाही तर, पाचवा यूरो कप खेळणाऱ्या या दिग्गज खेळाडूने मॅचच्या 87 व्या आणि 90व्या मिनिटांना दोन गोल करत त्याच्या टीमला 3-0 असा विजय मिळवून दिला.

First published: