जेट एअरवेज पुन्हा घेणार उड्डाण! Kalrock-Murari Lal Jalan असणार नवे मालक
युके बेस्ड कालरॉक कॅपिटल्स (Kalrock Capitals) आणि UAE मधील उद्योजक मुरारी लाल जालान (Murari Lal Jalan) कंसोर्टियम जेट एअरवेजचेचे (Jet Airways) नवे मालक असणार आहेत.
नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर: युके बेस्ड कालरॉक कॅपिटल्स (Kalrock Capitals) आणि UAE मधील उद्योजक मुरारी लाल जालान (Murari Lal Jalan) कंसोर्टियम जेट एअरवेजचेचे (Jet Airways) नवे मालक असणार आहेत. जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या क्रेडिटर्स कमिटीने (Committee Of Creditors COC) ने याला मंजुरी दिली आहे. जवळपास एका वर्षापूर्वी जेट एअरवेजचे संचालन सुरू ठेवण्यासाठी फंडसची समस्या उदभवली होती.
एअरलाइन्सच्या लेंडरद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या रिजॉल्यूशन प्रोफेशनल आशिष छाछरिया यांनी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, 'ई-वोटिंग आज अर्थात 17 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाली आहे आणि कमिटी ऑफ क्रेडिटर्सनी सेक्शन 30(4) अंतर्गत मुरारी लाल जालान आणि फ्लोरिएन फ्रिट्श (Florian Fritsch)चे रिजॉल्यूशन मंजूर केले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 26 क्रेडिटर्सनी जेट एअरवेजविरुद्ध दाखल केलेल्या दिवाळखोरी अर्जास राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जून 2019 मध्ये मान्यता दिली होती. जेट एअरवेज ही भारतातील पहिली दिवाळखोरीत निघालली पहिली विमानकंपनी आहे. कर्ज देणाऱ्या बँक समुहाने दिवाळखोरी प्रक्रियेनुसार जेट एअरवेजच्या विक्रीसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यामध्ये कारलॉक आणि जालान यांनी बाजी मारली आहे.
जेट एअरवेजला दोन संघटनांकडून निविदा प्राप्त झाले होते, एक म्हणजे यूकेस्थित कॅलरॉक कॅपिटल आणि युएईचे उद्योजक मुरारीलाल जालान आणि दुसरे हरियाणाचे फ्लाइट सिम्युलेशन टेक्निक सेंटर (एफएसटीसी), मुंबईतील बिग चार्टर आणि अबू धाबीमधील इम्पीरियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एलएलसी.
यामुळे कर्जबाजारी आणि दिवाळखोर झालेली विमान कंपनी, जेट एअरवेज पुन्हा एकदा उड्डाण करण्याच्या आशा वाढल्या आहेत. जेट एअरवेजने एप्रिल 2019 मध्ये काम बंद केले. एक वर्षाहून अधिक काळानंतर, लेंडर्सनी जेट एअरवेजचे पुनरुज्जीवन करण्याचा आणि विमान कंपनी पुन्हा ऑपरेट करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. नरेश गोयल यांच्या या एअरलाइन्स कंपनीचे फंड संपले होते, त्यामुळे त्यांचे कामकाज थांबले होते.