मराठी बातम्या /बातम्या /मनी /

CNG च्या दरात मोठी कपात, नवे दर आजपासून लागू; चेक करा मुंबई, पुणेसह राज्यातील प्रमुख शहरांतील दर

CNG च्या दरात मोठी कपात, नवे दर आजपासून लागू; चेक करा मुंबई, पुणेसह राज्यातील प्रमुख शहरांतील दर

CNG Price Cut: महानगर गॅस लिमिटेडने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी कपात केली आहे.

    मुंबई, 17 ऑगस्ट : राज्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी कपात काल जाहीर केली. तर पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लवकरच उद्योगांना मिळणारा काही नॅचरल गॅस दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड आणि मुंबईतील महानगर गॅससारख्या सिटी गॅस ऑपरेटरना पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या वाढत्या किमती रोखण्यात मदत होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी आणि पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. डिजिटल गोल्डचा आहे जमाना! या अ‍ॅपवर मिळत आहे बंपर कॅशबॅक, आजच खरेदी करा! राज्यातील विविध शहरातील सीएनजीचे दर >> मुंबई- 74 रुपये >> पुणे- 79 रुपये >> ठाणे- 74 रुपये >> नाशिक - 61.90 रुपये >> नवी मुंबई- 74 रुपये >> पिंपरी चिंचवड- 79 रुपये >> धुळे- 61.90 रुपये >> नागपूर- 109 रुपये दोन आठवड्यापूर्वीच सीएनजी दरात वाढ दोन आठवड्यापूर्वीच 3 ऑगस्ट रोजी मुंबईत सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात वाढ झाली होती. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ करण्यात आली होती. मोबाइल हरवल्यास बँक खात्यातून पैसे जाण्याची भीती? घाबरू नका अशी करा UPI ​​पेमेंट बंद राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर >> मुंबई - पेट्रोल 106.35 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.28 रुपये प्रति लीटर. >> पुणे - पेट्रोल 106.10 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.58 रुपये प्रति लीटर >> ठाणे- पेट्रोल 105.78 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.25 रुपये प्रति लीटर >> नाशिक- पेट्रोल 106.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.70 रुपये प्रति लीटर >> नागपूर- पेट्रोल 106.65 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.14 रुपये प्रति लीटर >> औरंगाबाद- पेट्रोल 106.70 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.16 रुपये प्रति लीटर >> जळगाव- पेट्रोल 107.22 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लीटर >> कोल्हापूर- पेट्रोल 106.02 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.54 रुपये प्रति लीटर
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Money, Mumbai

    पुढील बातम्या