मुंबई, 21 डिसेंबर : गेल्या काही दिवसात दररोज IPO एकतर उघडले जातात किंवा लिस्टिंग होतात किंवा ते सबस्क्रिप्शनसाठी खुले असतात. आयपीओ मार्केटमध्ये रोजची हालचाल असते. आज एकीकडे MapMyIndia चा IPO बाजारात लिस्ट झाला, तर दुसरीकडे CMS Info Systems Limited चा IPO ओपन झाला. हा IPO 23 डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल.
या IPO मधून कंपनी 1,100 कोटी उभारण्याचा विचार करत आहे. कंपनी 205 ते 216 रुपयांच्या प्राइस बँडवर 5.09 कोटी शेअर्स जारी करत आहे. हा IPO पूर्णपणे विक्रीसाठी ऑफर (OFS) आहे, याचा अर्थ सर्व पैसे प्रमोटर्सकडे जातील आणि कंपनीला त्यातून कोणतेही पैसे मिळणार नाहीत.
अँकर गुंतवणूकदारांकडून 330 कोटी जमा
CMS Info Systems ने इश्यू उघडण्याच्या एक दिवस आधी 20 डिसेंबर रोजी 12 अँकर गुंतवणूकदारांकडून 330 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने 1,52,77,777 इक्विटी शेअर्स अँकर गुंतवणूकदारांना 216 रुपये प्रति शेअर दराने वाटप केले आहेत.
Multibagger Stock : एक रुपयाच्या स्टॉकची कमाल, वर्षभरात एक लाखाची गुंतवणूक बनली 39 लाख
IPO लॉट साईज
गुंतवणूकदार किमान 69 शेअर्स आणि त्यानंतर 69 च्या पटीत शेअर्ससाठी बोली लावू शकतात. बोली लावणारा किमान एक लॉटसाठी बोली लावू शकतो आणि बोली लावणारा जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतो. किरकोळ गुंतवणूकदार 13 लॉटमध्ये किमान 14,904 रुपये आणि कमाल 1,93,752 रुपये गुंतवू शकतात.
देशातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपनी
CMS Info Systems ही देशातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपनी आहे. ही जगातील सर्वात मोठी कॅश मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात, एकूण 9.2 लाख कोटी रुपये एटीएम पॉइंट्स आणि रिटेल कॅश मॅनेजमेंटमधून चलनात गुंतले होते. कंपनी भारतातील बँका, वित्तीय संस्था, संघटित किरकोळ आणि ई-कॉमर्स कंपन्यांना कॅश मॅनेजमेंट, टेक्नोलॉजी संबंधित सोल्युशन आणि आऊटसोर्सिंग आधारावर प्रॉपर्टी प्लेसमेंट आणि मेंटनन्स संबंधित सर्व सुविधा पुरवते.
MapmyIndia च्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल, 1033 रुपये इश्यू प्राइस 1565 रुपये लिस्टिंग प्राईज
कंपनी 3 विभागांमध्ये व्यवसाय चालवते - कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस, मॅनेज्ड सेवा आणि कार्ड सर्विस. कंपनीचा सुमारे दोन तृतीयांश व्यवसाय कॅश मॅनेजमेन्ट सर्व्हिसमधून येतो. कंपनीकडे 3,965 कॅश व्हॅन आणि 238 शाखा आणि कार्यालये आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market