Home /News /money /

क्लीन एनर्जीतून तीन वर्षात दीड कोटी रोजगार निर्माण होणार; तुमचे वीजबिलाचे पैसेही वाचतील

क्लीन एनर्जीतून तीन वर्षात दीड कोटी रोजगार निर्माण होणार; तुमचे वीजबिलाचे पैसेही वाचतील

स्वच्छ ऊर्जेचं वाढत असलेलं महत्त्व पाहता भारतात 2025पर्यंत नोकरीच्या दीड कोटी संधी उपलब्ध होतील. स्वच्छ ऊर्जेशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये या नोकऱ्या असतील. 2025 पर्यंत सर्व जीवाश्म इंधन सबसिडी काढून टाकण्यासाठी यावर्षी सरकारने राष्ट्रीय कृती योजना तयार केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 24 जून : जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतसं जीवाश्म इंधनाच्या वापराचं (Fossil Fuel) प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची (Global Warming) समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे आता जीवाश्म इंधनाकडून स्वच्छ ऊर्जेकडे (Clean Energy) जाणं गरजेचं बनलं आहे. या स्वच्छ ऊर्जेतून 2025 पर्यंत भारतामध्ये दीड कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात आणि वीज बिलातही बचत होऊ शकते, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार, 2025 पर्यंत प्रति व्यक्तीवर होणाऱ्या वीज खर्चात 10 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. 2030 पर्यंत ती घट 31 टक्के होऊ शकते, तर 2035 पर्यंत ते प्रमाण 52 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. स्वच्छ ऊर्जेचं वाढत असलेलं महत्त्व पाहता भारतात 2025पर्यंत नोकरीच्या दीड कोटी संधी उपलब्ध होतील. स्वच्छ ऊर्जेशी निगडित विविध क्षेत्रांमध्ये या नोकऱ्या असतील. 2025 पर्यंत सर्व जीवाश्म इंधन सबसिडी काढून टाकण्यासाठी यावर्षी सरकारने राष्ट्रीय कृती योजना तयार केली आहे. 2030 पर्यंत देशांतर्गत कोळशावर चालणारे औष्णिक ऊर्जा प्रकल्प टप्प्याटप्प्याने बंद करावेत आणि पुढील आठ वर्षांत 70 टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी अक्षय्य ऊर्जेचा वापर झपाट्याने वाढवावा, असं आवाहन जी-7 राष्ट्रांना या अहवालात करण्यात आलं आहे. महिलांसाठी Home Loan घेणे स्वस्त आणि सोपं? कमी व्याजदरासह आणखी सुविधा मिळतात 'जगभरातल्या नागरिकांचं हवामानबदल आणि त्यामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी या अहवालात नमूद केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही G-7 नेत्यांना विनंती करतो,' असं आवाहन वी मीन बिझनेस कोलिशनच्या सीईओ मारिया मेंडेलस यांनी केलं आहे. स्वच्छ ऊर्जा म्हणजे ऊर्जानिर्मितीचा असा स्रोत, जो कार्बन उत्सर्जित करत नाही. ही अशी ऊर्जा उत्पादन प्रक्रिया आहे, जिचा हवामानावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही, सौरऊर्जा, पवन ऊर्जा, बायो-इथेनॉलपासून मिळणारी ऊर्जा हे स्वच्छ ऊर्जेचे प्रकार आहेत. हे ऊर्जा स्रोत न संपणारे असल्याने त्यांना अक्षय्य ऊर्जा असंही म्हणतात. PPF खात्यातून मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढता येतात, किती होईल नुकसान? चेक करा प्रोसेस दरम्यान, देशात सौर ऊर्जेबाबत (Solar Power) मोठ्या प्रमाणात जागृती होत असून, संशोधन करणाऱ्या मेरकोम इंडिया कंपनीच्या अहवालानुसार, मार्च तिमाहीत सोलर क्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत 50 टक्के वाढ झाली आहे. देशात जानेवारी ते मार्च 2022 या तीन महिन्यांत 3 हजार मेगावॉटहून अधिक क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत 2 हजार मेगावॉट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले होते. सरकारही सौरऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी सबसिडीसह जनजागृती अभियान राबवत आहे.
    First published:

    पुढील बातम्या