मराठी बातम्या /बातम्या /मनी /

तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करणाऱ्या ICICI Lombard च्या ILTakeCare ॲपद्वारे #RestartRight

तुम्हाला आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करणाऱ्या ICICI Lombard च्या ILTakeCare ॲपद्वारे #RestartRight

कोरोनापासूनच नाही तर एकंदरच आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

कोरोनापासूनच नाही तर एकंदरच आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

कोरोनापासूनच नाही तर एकंदरच आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 17 जुलै: दररोज आपल्याला कोरोनाबद्दल नवनवीन गोष्टी कळतात. जगभरात नेमकं काय चाललंय आणि पुढे काय होणार याचा कोणालाच थांगपत्ता नाही. यामुळे सर्वांच्या मनात अनिश्चिततेची भावना आहे. जग बदललेल्या नव्या काळाशी म्हणजेच सध्याच्या 'न्यू नॉर्मल'शी जुळवून घेत असता अनेकांच्या मनात स्वतःच्या व जिवलगांच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटते. घरात राहणं सुरक्षित आहेच, याला दुसरा पर्याय नाही. देव न करो, पण तुमच्या बाळाला / लहान मुलाला ताप आला किंवा तुमच्या घरातील वयस्कर व्यक्ती घसरल्याने त्यांना दुखापत झाल्यास डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. संकटं ही सांगून येत नाहीत; अपघात पण होऊ शकतात. म्हणूनच अशा निकडीच्या प्रसंगी आपण त्याला सामोरे जाण्यास तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. केवळ कोरोनापासूनच नाही तर एकंदरच आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा किती महत्त्वाचे आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण अर्थातच कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण जगाची तऱ्हा बदलली आहे आणि जो या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेईल तोच खऱ्या अर्थाने टिकेल. लोक सध्याच्या 'न्यू नॉर्मल'शी जुळवून घेत असता प्रतिष्ठित आरोग्य विमा कंपनी ICICI Lombard '#RestartRight' हे उद्दिष्ट ध्यानात ठेवून पुढची पावले उचलत आहे. ILHello Doctor कसं काम करतं? प्रत्येक युजर एका परवानाधारक (लायसन्सड) डॉक्टरांना दोन वेळा कॉल करून टेलीकन्सल्टेशन करू शकतो. या सेवेच्या माध्यमातून युजर डॉक्टरांकडून आपल्या कोणत्याही आरोग्य तक्रारींवर उपाय जाणून घेऊ शकतो. एकदा ग्राहकाने (युजरने) आपली लक्षणे सविस्तर डॉक्टरांना सांगितली व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली की डॉक्टर डायग्नोसिस (निदान) करून प्रिस्क्रिप्शन देतात; गरज भासल्यास ते ईमेलद्वारेसुद्धा प्रिस्क्रिप्शन देतील. हा ॲप तुमच्या सर्व आरोग्याच्या नोंदणी (हेल्थ रेकॉर्डस्) एकाच ठिकाणी साठवून ठेवतो. शिवाय या ॲपमुळे तुम्ही कमी दरातील औषधे दुकानातून विकत घेऊ शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करून थेट घरपोजही मागवू शकता. एवढेच नाही तर हा ॲप तुम्हाला या कंपनीशी संलग्न असलेल्या डॉक्टरांशी कॅशलेस संपर्क साधण्याची संधी देतो, सेकंड ओपिनियन (दुसऱ्या डॉक्टर / आरोग्य तज्ञांचा सल्ला) घेण्याची संधी देतो आणि तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या डायग्नोस्टिक्स केंद्रांत जाऊन वैद्यकीय चाचण्या करण्याची देखील सेवा उपलब्ध करून देतो. रुग्णालयाचा खर्च आणि इन्शुरन्ससंबंधी पेपरवर्कबाबत चिंता नसावी; ILTakeCare ॲप यासंबंधित सर्व गोष्टींची काळजी घेतो. या ॲपद्वारे तुम्हाला ॲप्लिकेशनसंबंधित सर्व माहिती दिली जाते, हा ॲप तुमचे आरोग्य ट्रॅक करतो (चांगले स्वास्थ्य राखण्याची जबाबदारी घेतो) आणि 24/7 अँब्युलन्स सेवा देखील पुरवण्याचे काम करतो. ICICI Lombard हेल्थ इन्शुरन्स तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमची साथ देण्याचे वचन देतो (#NibhayeVaade). IL Take Care ॲप तुमच्या सर्व वैद्यकीय अडीअडचणीत तसेच पॉलिसीधारक व त्यांच्या कुटुंबियांना दैनंदिन आहार आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करण्याचे वचन देतो. या सर्व सेवा व सुविधांचा त्वरित लाभ घेण्यासाठी आजच डाउनलोड करा ILTakeCare ॲप जो ॲपल ॲप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोअर या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. भागीदाराचे भाष्य
First published:

Tags: Restart Right

पुढील बातम्या