मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ICICI Lombard चा ILTakeCare ॲप ग्राहकांना कॅशलेस आणि पेपरलेस वैद्यकीय व आरोग्य सेवेचा लाभ देतो

ICICI Lombard चा ILTakeCare ॲप ग्राहकांना कॅशलेस आणि पेपरलेस वैद्यकीय व आरोग्य सेवेचा लाभ देतो

आरोग्यविषयक तक्रारींसंबंधी सेकंड ओपिनियन (दुसर्‍या डॉक्टर / आरोग्य तज्ञांचा सल्ला) घेऊ शकता आणि अशा अनेक सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊ शकता.

आरोग्यविषयक तक्रारींसंबंधी सेकंड ओपिनियन (दुसर्‍या डॉक्टर / आरोग्य तज्ञांचा सल्ला) घेऊ शकता आणि अशा अनेक सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊ शकता.

आरोग्यविषयक तक्रारींसंबंधी सेकंड ओपिनियन (दुसर्‍या डॉक्टर / आरोग्य तज्ञांचा सल्ला) घेऊ शकता आणि अशा अनेक सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊ शकता.

    मुंबई, 17 जुलै: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्या सर्वांच्याच जीवनशैलीचा कायापालट झाला आहे. आरोग्याच्या तक्रारींमुळे व लॉकडाऊनमुळे तणावाखाली असलेल्यांसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. ताप असो किंवा दातदुखी, सध्याच्या परिस्थितीत आपल्याला त्वरित डॉक्टरला भेट देता येईलच याची शाश्वती नाही. येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय पर्याय नाही; 'द शो मस्ट गो ऑन'! पण नेमका विश्वास ठेवायचा तरी कोणावर? सर्वच, 'आम्ही तुमच्या सेवेस हजर आहोत'चा नारा लावून लोकांचे लक्ष वेधत आहेत. चिंता नसावी! आजपर्यंत कायम तुमची साथ देणाऱ्यांवर निश्चिंतपणे विश्वास ठेवा. ICICI Lombard त्यांच्या 'निभाएँ वादें' या उद्दिष्टाला पूर्णपणे न्याय देऊन तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ILTakeCare हा ‘युजर – फ्रेंडली’ ॲप ICICI Lombard या देशभरातील सर्वोत्कृष्ट विमा कंपनीने हा ॲप सुरु करून एक अनोखी उपाययोजना केली आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहक लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सेवेतील तज्ञांशी संपर्क साधून कधीही (24x7) टेलीकन्सल्टेशनचा लाभ घेऊ शकतात. ILHelloDoctor हे फीचर प्रत्येक ग्राहकाला (MBBS ची पदवी असलेल्या) डॉक्टारांना दोन वेळा फोन करण्याची व आपल्या आरोग्यविषयक तक्रारींविषयी बोलण्याची संधी देतं. देशभरातील सर्वात मोठ्या व विश्वासू इन्शुरन्स ब्रँडने हे अनोखे पाऊल उचलून ग्राहकांचे स्वास्थ्य त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे सिद्ध करून दाखवले आहे. सर्वांनाच डॉक्टरांशी संपर्क साधणे शक्य नसल्याने व जागोजागी दवाखाने बंद असल्याने आपण सर्वच हतबल झालो आहोत. परंतु आपत्कालीन प्रसंगी ILHelloDoctor हे फीचर आपल्याला घरात बसून टेलीकन्सल्टेशनच्या माध्यमातून क्वॉलीफाइड डॉक्टरांशी संपर्क साधण्याची एक मोठी संधी देत आहे. हे डॉक्टर तुमची लक्षणे जाणून घेऊन व त्या लक्षणांवरील पुरेपूर आणि योग्य ती माहिती सांगून डायग्नोसिस करतील व गरज भासल्यास तुम्हाला डिजिटल प्रिस्क्रिप्शनही देतील. ...आणखी एक पाऊल पुढे... या फीचर्सची सेवा सर्वांसाठी उपलब्ध आहेच; शिवाय ICICI Lombard चे पॉलिसीधारक आरोग्य, मोटार व प्रवास विमा आणि प्रकृतीसंबंधी बाबींसाठी ILTakeCare ॲपचा लाभ घेऊ शकतात. हा ॲप तुम्हाला व्यायाम व आहारासंबंधी माहिती देतो, तुम्ही दिवसभरात किती पावलं चाललात ते मोजून दाखवतो (स्टेप्सचा काउंट देतो), तुम्ही किती वेळ झोपलात ते सांगतो, तसेच न्यूट्रिशनिस्ट व आरोग्य तज्ञांशी ऑनलाईन चॅट करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देतो. शिवाय, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर विम्याशी निगडित नोटिफिकेशन्स पाहता येतील, तुम्ही आरोग्यविषयक तक्रारींसंबंधी सेकंड ओपिनियन (दुसर्‍या डॉक्टर / आरोग्य तज्ञांचा सल्ला) घेऊ शकता आणि अशा अनेक सुविधांचा पुरेपूर लाभ घेऊ शकता. या ॲपच्या काही अनोख्या फीचर्सबद्दल जाणून घ्या. -ILHelloDoctor या फीचरद्वारे त्वरित डॉक्टरांशी आणि तुमच्या परिसरातील औषधविक्रेते व डायग्नोस्टिक्स (तपासण्या / चाचण्या करून देणार्‍या) केंद्रांशी संपर्क साधा. -परवानाधारक (लायसन्सड) डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी अपॉईंटमेंट बुक करा व फोनद्वारे अमर्यादित ॲक्सेस मिळवा. -वाजवी किमतीतील औषधे दुकानात जाऊन विकत घ्या किंवा तुमच्या घरी ऑर्डर करा. -तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या डायग्नोस्टिक्स केंद्रांत जाऊन चाचण्या करा. -तुमच्या हेल्थ चेक-अपचे नियोजन करा. -ICICI Lombard च्या आरोग्य विम्याने कॅशलेस वैद्यकीय उपचारांचा लाभ घ्या. -या एका ॲपवरूनच तुमच्या पॉलिसीचे सर्व फायदे, विमा उतरवण्यासाठीची पात्रता आणि सर्व ट्रान्सॅक्शन्सविषयी माहिती मिळवा. -तुम्ही आरोग्य तज्ञांकडून मिळालेल्या सल्ल्याविषयी व लाभलेल्या सेवेसंबंधी तुमची प्रतिक्रिया (रिव्ह्यू आणि रेटिंग्सद्वारे) देऊ शकता. -तुम्ही 24 तास चालू असलेल्या कॉल सेंटरला कॉल करून किंवा ऑनलाईन चॅट करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. घरबसल्या आरोग्यासंबंधित अधिकाधिक सेवांचा लाभ घेण्याची सुविधा देणाऱ्या या ॲपच्या विविध युजर्सनी सकारात्मक प्रतिक्रिया (रिव्ह्यूज) दिल्या आहेत. तुमच्या विमा, आरोग्य व स्वास्थ्यासंबंधित सर्व गरजा पूर्ण करणारा ILTakeCare हा ॲप निश्चितच एक 'कूल' ॲप आहे असे म्हणण्यास हरकत नाही. हा ॲप Apple App Store आणि Google Play Store अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे; तुम्हाला तो फक्त डाउनलोड आणि इंस्टॉल करायचा आहे. तुमच्या कुटुंबीय व मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेर करा, म्हणजे खऱ्या अर्थाने आपण सर्व नव्याने आयुष्य सुरु करू शकतो, अर्थात ‘वी ऑल कॅन’ #RestartRight! त्वरित ॲप डाउनलोड करा! भागीदाराचे भाष्य
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या