Home /News /money /

पेट्रोल स्वस्त होणार हो! कारण ठरतोय हा जीवघेणा चिनी व्हायरस

पेट्रोल स्वस्त होणार हो! कारण ठरतोय हा जीवघेणा चिनी व्हायरस

चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या वातावरणात चीनमध्ये असलेली कच्च्या तेलाच्या मागणीत घट होऊ शकते.

    मुंबई, 22 जानेवारी : चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाय अलर्ट देण्यात आला आहे. या वातावरणात चीनमध्ये असलेली कच्च्या तेलाच्या मागणीत घट होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती 3 डॉलर प्रतिबॅरल एवढ्या स्वस्त होऊ शकतात. गोल्डमॅन सॅक्स या रेटिंग एजन्सीने पेट्रोलच्या किंमतींबद्दल अहवाल प्रसिद्ध केलाय. चीनमधला व्हायरस आणि पेट्रोलचा संबंध काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण पेट्रोलच्या आंतरराष्ट्रीय अर्थकारणात याचं उत्तर दडलंय. कच्चं तेल होणार स्वस्त भारतासारखंच चीनसुद्धा 90 टक्के कच्चं तेल परदेशी बाजारातून विकत घेतो. आकडेवारीनुसार, 2019 मध्ये चीनमध्ये 50.6 कोटी टन कच्चं तेल खरेदी केलं होतं. गोल्डमन सॅक्सच्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये कच्च्या तेलाची मागणी घटू शकते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चं तेल 3 डॉलर प्रतिबॅरल स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, कच्चं तेल स्वस्त झालं तर याचा थेट फायदा भारतातल्या ग्राहकांना मिळेल. भारतात पेट्रोल 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं. (हेही वाचा : दिवसा स्वस्त आणि संध्याकाळी महाग होणार वीज, ग्राहकांना होणार फायदा) कसे ठरतात पेट्रोल - डिझेलचे दर? ज्या किंमतीला पेट्रोल पंपातून पेट्रोलची खरेदी होते त्याच्या 48 टक्के बेस प्राइस म्हणजे आधार मूल्य असतं. त्यानंतर आणखी काही रक्कम मिळून त्याची किंमत वाढते. आतापर्यंत इंधनाच्या दरात GST समाविष्ट केलेलं नाही. त्यामुळे यावर एक्साइज ड्युटी लागते आणि वॅटही. केंद्र सरकार पेट्रोलच्या विक्रीवर एक्साइज ड्युटी घेतं आणि राज्य सरकार व्हॅट घेतं. तुम्हाला तुमच्या शहरातले पेट्रोल-डिझलचे भाव किती आहेत ही माहिती हवी असेल तर तुम्ही 92249 92249 या नंबरवर sms पाठवू शकता. यामध्ये शहरानुसार कोडही टाकायचा आहे. ============================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Money, Petrol

    पुढील बातम्या