नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : चीनची कार तयार करणारी कंपनी एमजी मोटर्स (MG Motors)कंपनीला भारतात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आता या कंपनीने निर्णय घेतला आहे की, भारताच्या प्रमोशन डिपार्टमेंटकडून (DPIIT) परवानगी घेऊन पुन्हा भारतात गुंतवणूक करेल. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एमजी मोटर्स आपले नवीन मॉडेल लाँच करण्यासाठी आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. मात्र एफडीआय नियमात बदल झाल्यामुळे आता कंपनीला गुंतवणूक करण्यापूर्वी डीपीआयआयटीकडून परवानगी घ्यावी लागेल.
वाचा-खिशात डेबिट-क्रेडिट कार्ड नसेल तरीही करता येईल पेमेंट, ही बँक देतेय खास सुविधा
एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष व एमडी राजीव छाबरा म्हणाले की, देशासाठी काय योग्य आहे आणि काय नाही याचा निर्णय घेण्याचा हक्क भारत सरकारकडे आहे. प्रत्येक सरकारने देशाच्या भल्याचा विचार केला पाहिजे. दरम्यान जेव्हा छाबरा यांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या भावनेबद्दल विचारले गेले तेव्हा ते म्हणाले की हे सर्व शॉर्ट टर्म आहे. मात्र जर लॉंग टर्मचा विचार केल्यास कंपनीची वाढ होईल. छाबरा यांनी सांगितले की, अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यात देशांमध्ये तणाव आहे, मात्र यामुळे व्यवसायावर परिणाम होत नाही.
वाचा-लॉकडाऊनमध्ये सावधपणे खर्च करण्याचे प्रमाण वाढले,परंतू ऑनलाइन खरेदीत भारतीय अव्वलकंपनीने भारतात केली आहे 300 रुपयांची गुंतवणूक
एमजी मोटर्सने यापूर्वीच भारतात 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीने भारतात जनरल मोटर्सचा प्लांटही विकत घेतला आहे. सध्या ही कंपनी भारतात हेक्टर प्रीमियम एसयूव्हीची विक्री करीत आहे. छाबरा यांनी कंपनीच्या नवीन मॉडेल ग्लॉस्टर विषयीही चर्चा केली ही एक लक्झरी SUV असेल. ते म्हणाले की, एमजी मोटर्स आता भारतात लोकलायजेशन करण्यावर भर देईल.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.