नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : सध्याच्या काळात अधिकतर शाळांमध्ये मुलांच्या ऍडमिशनवेळी आधार कार्ड Aadhaar Card मागितलं जातं. आधार कार्ड कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी बनवलं जाऊ शकतं. मुलांच्या ऍडमिशनवेळी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जाणून घ्या मुलांचं आधार कार्ड कसं काढाल?
मुलांच्या आधार कार्डसाठी कसं कराल एनरोलमेंट?
मुलांसाठी आधार बनवण्याची प्रक्रिया जवळपास मोठ्यांसाठी आधार बनवण्याच्या प्रक्रियेप्रमाणे असते. पालकांना आपला मुलाला घेऊन जवळच्या आधार केअर सेंटरवर जावं लागेल आणि एक फॉर्म भरावा लागेल. 5 वर्षांहून लहान असणाऱ्या मुलांचा बायोमॅट्रिक डेटा घेतला जात नाही. त्यांचं UID पालकांच्या आधार डेटाच्या आधारे प्रोसेस केलं जातं. परंतु मुलांचं वय 5 वर्षाहून अधिक असल्यास त्यांचा बायोमॅट्रिक डेटा रजिस्टर केला जाईल.
हे वाचा -
उच्चांकी पातळीवरुन 6000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या दिवाळीपर्यंत काय अ
90 दिवसांमध्ये मिळेल लहान मुलांचं आधारकार्ड
वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एनरोलमेंट स्लिप जनरेट होईल. या एनरोलमेंट स्लिपवर एनरोलमेंट आयडी, नंबर आणि तारीख दिली जाईल. या एनरोलमेंट आयडीच्या मदतीने आधार स्टेटसबाबत माहिती घेता येईल. आधार एनरोलमेंट केल्यानंतर 90 दिवसांमध्ये आधार अर्जदाराच्या घरी पोस्ट केलं जाईल.
हे वाचा -
आता PF Account मधून तुम्ही काढू शकता Advance रक्कम, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
लहान मुलांचं बायोमॅट्रिक आधारमध्ये कसं अपडेट कराल?
ज्यावेळी मुलांचं वय 5 ते 15 वर्षांपर्यंत असतं, त्यावेळी त्यांच्या आधारमध्ये बायोमॅट्रिक डेटा अपडेट केला जाऊ शकतो. यावेळी 10 बोटांची प्रिंट, डोळ्यांचं स्कॅनिंग आणि फोटो अपडेट केला जाईल. लहान मुलांचा बायोमॅट्रिक डेटा मोफत अपडेट केला जातो. त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाही.
हे वाचा -
Amazon लवकरच आणणार ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल; 1 लाखहून अधिक दुकानदारांना कामाच
कोणती कागदपत्रं आवश्यक?
लहान मुलांचं आधार कार्ड बनवण्यासाठी त्याचं जन्म प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे. मुलं शाळेत जात असल्यास, जन्म प्रमाणपत्राऐवजी मुलांच्या शाळेतील फोटोयुक्त आयडीही दिला जाऊ शकतो. त्याशिवाय मुलांच्या आई-वडिलांचे आधार डिटेल्सही देणं गरजेचं आहे. आई-वडिलांचा पत्ता आणि आयडी प्रुफही आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.