मुंबई, 29 नोव्हेंबर: 2020 वर्षातला शेवटचा महिना लवकरच सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्यात तुम्ही एखाद्या कामासाठी बँकेमध्ये जाल पण बँकच बंद आहे असं घडू शकतं. कारण पुढच्या महिन्यात भरपूर दिवस बँका बंद राहणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांना जरी आराम मिळणार असला तरी सामान्य माणसांच्या कामाचा यामुळे खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी सुट्टी तर नाही ना याची एकदा खात्री करुन मगच जा ! अर्थात प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या आहेत.
6 डिसेंबर, 13 डिसेंबर, 20 डिसेंबर, 27 डिसेंबर या दिवशी रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. याशिवाय 12 डिसेंबर आणि 26 डिसेंबर रोजी महिन्यातला दुसरा आणि चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल. याशिवायही काही सुट्ट्या असणार आहेत.
गोव्यामध्ये सलग 4 दिवस बँकांना सुट्ट्या
गोव्यामध्ये 17 डिसेंबर रोजी लॉसोन्ग पर्वनिमित्त, 18 डिसेंबर रोजी यू सो सो थम यांच्या डेथ अॅनिव्हरसरीनिमित्त सुट्टी असणार आहे. तसंच 19 डिसेंबर रोजी गोवा लिबरेशन डेनिमित्त बँका बंद असतील. आणि 20 डिसेंबर रोजी रविवार आल्यामुळे साप्ताहिक सुट्टीमुळे बँका उघडणार नाहीत.
25 डिसेंबर रोजी नाताळनित्त, 26 डिसेंबर रोजी चौथा शनिवार असल्यामुळे 27 डिसेंबर रोजी रविवारनिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. 31 डिसेंबर रोजीही काही राज्यात बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळाला भेट द्या. पुढच्या महिन्यात बँकेच्या कामाचं योग्य नियोजन करा. आणि तारीख बघूनच बँकेत जा !