घरबसल्या तपासता येईल PAN कार्डचे स्टेटस, या आहेत काही सोप्या पद्धती

इंटरनेटच्या या युगात पॅनकार्ड (PAN Permanent Account Number) संबंधी सर्व कामे करणे अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या देखील तुमच्या पॅनकार्ड संदर्भातील माहिती मिळवू शकता किंवा अपडेट करू शकता.

इंटरनेटच्या या युगात पॅनकार्ड (PAN Permanent Account Number) संबंधी सर्व कामे करणे अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या देखील तुमच्या पॅनकार्ड संदर्भातील माहिती मिळवू शकता किंवा अपडेट करू शकता.

  • Share this:
    मुंबई, 16 सप्टेंबर : इंटरनेटच्या या युगात पॅनकार्ड (PAN Permanent Account Number) संबंधी सर्व कामे करणे अतिशय सोपे झाले आहे. तुम्ही घरबसल्या देखील तुमच्या पॅनकार्ड संदर्भातील माहिती मिळवू शकता किंवा अपडेट करू शकता. ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून तुम्ही पॅनकार्डच्या वेबसाइटवरून पॅनकार्ड ट्रॅक करू शकता.  जाणून घ्या ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमचे पॅनकार्ड स्टेटस कसे तपासू शकता. PAN किंवा UTI वेबसाइटवरील कूपन क्रमांक वापरून तपासा पॅन कार्डचे स्टेटस -सुरुवातीला www.trackpan.utiitsl.com/PANONLINE/#forward या वेबसाईटवर जा -त्यानंतर तुमचा 10 अंकी पॅन क्रमांक टाका -त्यानंतर पुढील स्टेजमध्ये तुमची जन्मतारीख टाका (हे वाचा-आर्थिक मंदीच्या संकटात देखील टाटा समुह देणार 235 कोटींचा बोनस) -त्यानंतर येणारा Captcha Code टाका -त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर पुढील पेजवर तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड संदर्भातील माहिती उपलब्ध होईल. पॅन कार्डचे स्टेटस मोबाईल क्रमांकाच्या मदतीने तपासा तुमच्या पॅनकार्डचे स्टेटस तुम्ही मोबाईल क्रमांच्या मदतीने देखील पाहू शकता. रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून  020-27218080 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमच्या पॅनकार्डचे स्टेटस तपासू शकता. 15 अंकी acknowledgement सांगून तुम्ही तुमच्या पॅनकार्डचे स्टेटस तपासू शकता. SMS च्या माध्यमातून तुम्ही SMS च्या माध्यमातून  देखील तुमच्या पॅनकार्डचे स्टेटस तपासू शकता. तुम्हाला 15 अंकी acknowledgement क्रमांक ‘NSDLPAN’ असे टाईप करून ‘57575’ या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पॅनकार्ड संदर्भातील माहिती SMS  वर उपलब्ध होईल आधार क्रमांक वापरून तपासा पॅन कार्डचे स्टेटस -आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा -त्यानंतर  ‘check pan status’ या पर्यायावर क्लिक करा. -यानंतर पुढील पेज ओपन झाल्यानंतर तुमचा 12 आकडी आधार क्रमांक टाका (हे वाचा-'शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम', घोटाळ्याबाबत मोदी सरकारचे स्पष्टीकरण) -या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे एक Captcha code येईल. हा कोड टाकल्यानंतर पुढे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅनकार्ड संदर्भातील माहिती तुम्हाला उपलब्ध होईल. नाव आणि जन्मतारीख वापरून वापरून देखील समजू शकते पॅनकार्डचे स्टेटस -www.incometaxindiaefiling.gov.in/ या ऑफिशिअल वेबसाईटवर जा -‘Verify your PAN Details’ या लिंकवर क्लिक करा. -त्यानंतर दुसरे पेज ओपन झाल्यानंतर त्यामध्ये विचारली जाणारी माहिती भरा. उदा; नाव, जन्मतारीख इत्यादी. -त्यानंतर तुम्ही अप्लिकेबल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढे एक Captcha code येईल. -हा कोड टाकल्यानंतर पुढे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पॅनकार्ड संदर्भातील माहिती तुम्हाला उपलब्ध होईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: