Home /News /money /

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, तपासा तुमच्या शहरातील आजचा भाव

दिल्लीत आज (Petrol Diesel Price Today 18 January 2022) पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत चढ-उतारादरम्यान देशात इंधन दर अद्याप स्थिर आहे.

  नवी दिल्ली, 18 जानेवारी : आईओसीएल (IOCL) ने आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे रेट (Petrol Diesel Price Today 18 January 2022) जारी केले आहेत. आजही इंधन दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. मागील 74 दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहे. इंधन दरात 4 नोव्हेंबर 2021 नंतर कोणतेही बदल झालेले नाहीत. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये प्रति लीटरने कपात केली होती. दिल्लीत आज (Petrol Diesel Price Today 18 January 2022) पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत चढ-उतारादरम्यान देशात इंधन दर अद्याप स्थिर आहे.

  हे वाचा - Credit Card स्टेटमेंटमध्ये मिळते खर्चाची माहिती, वाचा प्रत्येक शब्दांचा अर्थ

  महानगरात काय आहे आजचा भाव? – दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर – मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर – चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर – कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

  हे वाचा - Credit Card वापरताना छोट्या चुका पडतील महागात, अशाप्रकारे करा Smart वापर

  असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर - पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check diesel petrol price daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

  हे वाचा - विमान प्रवास महागण्याची शक्यता, जानेवारीत दुसऱ्यांदा वाढले ATF चे भाव

  देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल-डिझेल दरात एक्साइज ड्यूटी, डिलर कमीशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर याचा किंमत दुप्पट होते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price

  पुढील बातम्या