• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • असे आहेत PPF, NSC आणि इतर छोट्या बचत योजनांचे व्याज दर

असे आहेत PPF, NSC आणि इतर छोट्या बचत योजनांचे व्याज दर

PPF, NSC, sukanya samruddhi yojana - आजपासून ( 1 जुलै ) छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी झालेत. हे नवे दर काय आहेत, ते पाहू या -

 • Share this:
  मुंबई, 01 जुलै : आजपासून ( 1 जुलै ) छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी झालेत.सरकारनेच हे दर कमी केलेत. पब्लिक प्राॅव्हिडंट फंड, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि किसान विकास पत्र यांचे व्याज दर कमी झालेत. हे नवे दर काय आहेत, ते पाहू या - पीपीएफ ( PPF ) -  जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत 15 वर्षांचं PPF असेल तर वार्षिक व्याज दर 7.9 टक्के आहे. अगोदर हा व्याज दर 8 टक्के आहे. NEET 2019 Counselling : पहिल्या फेरीचा निकाल आज नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट - NSC ही 5 वर्षांची स्माॅल सेव्हिंग्ज स्कीम आहे. त्याचा व्याज दर 7.9 टक्के आहे. आधी तो 8 टक्के होता. हे व्याजाचे पैसे मॅच्युरिटीनंतर मिळतात. किसान विकास पत्र - KVP चा व्याज दर 7.7 टक्के आहे आणि मॅच्युरिटी 112 महिन्यांची आहे. नागपूर युनिव्हर्सिटीत 117 पदांवर भरती, 'या' उमेदवारांना संधी पोस्ट आॅफिस टर्म डिपाॅझिट - पोस्ट आॅफिस टर्म डिपाॅझिटचा 1 ते 3 वर्षाचा व्याज दर 6.9 टक्के आहे. तो तिमाहीनं दिला जातो. पाच वर्षांचा व्याज दर आहे 7.7 टक्के. रिकरिंग डिपाॅझिटचं रिटर्न 7.2 टक्के आहे. आधी त्याचा दर 7.3 टक्के होता. पोस्ट आॅफिस मन्थली इन्कम स्कीम - पाच वर्षांची पोस्ट आॅफिस मन्थली इन्कम स्कीम ( MIS )चा व्याज दर 7.6 टक्के झालाय. अगोदर तो 7.7 टक्के होता. World Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम - ही योजना 5 वर्षांची आहे. याचा व्याज दर आहे 8.6 टक्के. गेल्या वेळी तो होता 8.7 टक्के. याचं व्याज तिमाही मिळतं. सुकन्या समृद्धी स्कीम - या योजनेचं व्याज दरही कमी झालंय. आता ते 8.4 टक्के आहे. पूर्वी ते 8.5 टक्के होतं. सेव्हिंग डिपाॅझिट - सेव्हिंग्ज डिपाॅझिटवरचा व्याज दर 4 टक्के आहे. SPECIAL REPORT : मुंबईची तुंबई झालीच नाही, ऐका महापौर काय म्हणताहेत...
  Published by:Sonali Deshpande
  First published: