मुंबई, 21 ऑक्टोबर : भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) ग्राहकांना EPFO कडून दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी मिळाली आहे. ईपीएफओने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफ खातेधारकांचे व्याज जमा करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी ग्राहकांच्या खात्यात पैसे येऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व खातेधारक त्यांच्या खात्यात किती पीएफ पैसे आले हे पाहण्यासाठी त्यांचे पीएफ खाते तपासत आहेत. तुम्ही तुमचे PF स्टेटमेंट कसे काढू शकता हे जाणून घ्या.
पैसे आले नसतील तर काळजी करू नका
आतापर्यंत अनेक खातेदारांना व्याजाचे पैसे मिळाले नाहीत पण लवकरच त्यांच्या खात्यात पैसे येतील अशी अपेक्षा आहे. व्याजाची रक्कम झोननिहाय जमा केल्यामुळे, अनेक वेळा वेगवेगळ्या झोनमध्ये पैसे जमा होण्यास वेळ लागतो.
किती व्याजाचे पैसे जमा झाले?
विशेष म्हणजे, 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावाला सरकारने आधीच ग्रीन सिग्नल दिला होता. कामगार मंत्रालयानेही या निर्णयाला संमती दिली होती. आता EPFO ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करण्यात येत आहे.
लाखाचे 12 लाख फक्त 18 महिन्यात! 'या' शेअरमध्ये गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला काय?
पीएफ पासबुक कसे काढायचे?
>> पीएफमधील तुमची शिल्लक ऑनलाईन तपासण्यासाठी EPF पासबुक पोर्टलवर जा.
>> आपला UAN आणि Password वापरून या पोर्टलवर लॉग इन करा.
>> यामध्ये, Download/View Passbook वर क्लिक करा आणि नंतर पासबुक तुमच्या समोर ओपन होईल.
>> यामध्ये तुम्ही शिल्लक पाहू शकता. तुम्ही तुमचे पासबुक येथून डाउनलोड करू शकता.
एसएमएसद्वारे बॅलेन्स चेक करा
EPFO कडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून EPFO UAN LAN मेसेज 7738299899 वर पाठवा. LAN म्हणजे तुमची भाषा. जर तुम्हाला इंग्रजीमध्ये माहिती हवी असेल तर तुम्हाला LAN ऐवजी ENG लिहावे लागेल. त्याचप्रमाणे हिंदीसाठी HIN आणि तमिळसाठी TAM लिहावे लागेल. हिंदीत माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला EPFOHO UAN HIN लिहून संदेश पाठवावा लागेल.
Gold Price Today: दिवाळीपूर्वी सोने-चांदी दरात तेजी, तपासा आजचा लेटेस्ट रेट
मिस्ड कॉलद्वारे डिटेल्स मिळवा
मिस्ड कॉलद्वारे देखील आपले ईपीएफ शिल्लक जाणून घेता येऊ शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, PF Withdrawal