Gold Price Today: आजही सोन्याचांदीला झळाळी, इथे तपासा नवे दर

Gold Silver Price, 11 February 2021: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत तर चांदीलाही झळाळी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

Gold Silver Price, 11 February 2021: देशांतर्गत बाजारात आज सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत तर चांदीलाही झळाळी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: देशांतर्गत बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात (Gold Price) वाढ झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 11 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) किरकोळ वधारले आहेत. आज चांदीच्या दरात देखील (Silver Price Today) वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 36 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 454 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Markets) सोन्याचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. चांदीचे दर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिर आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजने सोन्याचांदीच्या किंमतीबाबत ही माहिती दिली आहे. आधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 47,473 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. तर चांदी 68,576 रुपये प्रति किलोग्रॅम होती. यामध्ये आज गुरुवारी वाढ झाली आहे. (हे वाचा-कर्ज घेणार असाल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, लोन मिळवताना ठरेल फायद्याचे) सोन्याचे आजचे भाव (Gold Price on 11th February 2021) दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोनं प्रति तोळा 36 रुपयांनी महाग झालं आहे. या वाढीनंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 47,509 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47,473 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,861 डॉलर प्रति औंस आहेत. (हे वाचा-राज्यातील आणखी एका सहकारी बँकेवर आर्थिक संकट, पैसे काढण्यावर RBIचे निर्बंध) चांदीचे आजचे भाव (Silver Price on 11th February 2021) सोन्याप्रमाणेच चांदीमध्ये देखील गुरुवारी वाढ झाली आहे. चांदी 454 रुपये प्रति किलोने महाग झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 69,030 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market) चांदीचे भाव 27.18 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. त्यांनी असे म्हटले की अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेजबाबत अपेक्षा वाढल्यामुळे आणि डॉलरमधील कमजोरीमुळे सोन्याचे दर वाढत आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: