नवी दिल्ली 30 मे: सोन्याच्या किमतींमध्ये
(Gold Price Today) आज रविवारी किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईच्या म्हणण्यानुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या किमती 10 रुपयांनी वाढून 46,590 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्या आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,590 रुपयांवर पोहोचली आहेत. वेबसाईटनुसार, शनिवारी सोन्याची किंमत 46,580 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही सोन्याचे दर ऑगस्टमधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत कमीच आहेत.
चार मोठ्या शहरांमध्ये काय आहेत दर -
दिल्लीमध्ये सोन्याचा दर आज 46,760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे
मुंबईमध्ये सोन्याचा दर आज 46,590 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नईमध्ये 46,120 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोलकातामध्ये 48,170 रुपये प्रति 10 ग्रॅम
50 हजारात सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखाची कमाई; वाचा सविस्तर
24 कॅरेट सोन्याचे दर -
दिल्लीमध्ये 50,760 रुपये प्रति 10 ग्रॅम
मुंबईमध्ये 47,590 रुपये प्रति 10 ग्रॅम
चेन्नईंमध्ये 50,310 रुपये प्रति 10 ग्रॅम
कोलकातामध्ये 50,750 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदीचे दर -
दिल्लीमध्ये 71,600 रुपये प्रति 1 किलोग्रॅम
मुंबई मध्ये 71,600 रुपये प्रति 1 किलोग्रॅम
चेन्नईमध्ये 76,200 रुपये प्रति 1 किलोग्रॅम
कोलकातामध्ये 71,600 रुपये प्रति 1 किलो
ना फाटणार, ना भिजणार; लवकरच तुमच्या खिशात असणार 100 रुपयाची नवी नोट
अशी तपासा सोन्याची शुद्धता -
आता सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारनं एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care app' च्या माध्यमातून ग्राहक (Consumer) सोन्याची शुद्धता (Gold Purity) तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर याबाबतची कोणतीही तक्रारही तुम्ही करू शकता. या सामानात लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक याबाबतही तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून तक्रारीनंतर लगेगच ग्राहकाला याबाबतची माहिती मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.